शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Astro Tips: शनिवारी घरात लावा पंचमुखी हनुमानाचा फोटो, पण नेमक्या कोणत्या दिशेला ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 7:00 AM

1 / 6
भीती वाटली तर राम राम म्हण, हा संस्कार बालपणापासून आपल्या मनावर झालेला आहे. कारण जिथे रामनाम तिथे हनुमान हे समीकरण आहे. त्यामुळे संकटांना पळवून लावण्याची ताकद हनुमंतामध्ये आहे. म्हणूनच वास्तू मध्ये हनुमंताचा फोटो लावावा असे सांगितले जाते. पण कोणत्या दिशेला लावलेला फोटो कोणते लाभ देतो ते जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
2 / 6
पंचमुखी हनुमानाची प्रतिमा चारही दिशांनी येणारे संकट पळवून लावते, शिवाय पाचवे मुख आपल्या वास्तूकडे कृपादृष्टी ठेवून वाईट लहरींपासून घराचे संरक्षण करते. म्हणून पंचमुखी हनुमानाचा फोटो घरात लावा असे वास्तु तज्ज्ञ सांगतात. मात्र ही प्रतिमा बैठक घातलेली अर्थात बसलेले पंचमुखी हनुमानाची असावी.
3 / 6
पूर्व दिशा : पंचमुखी हनुमानाचा फोटो पूर्व दिशेला लावला असता आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू लागतात. पूर्व दिशा ही सूर्योदयाची दिशा असल्याने ती सकारात्मक मानली जाते. शिवाय त्या दिशेला लावलेला पंचमुखी हनुमानाचा फोटो वास्तू तसेच आपल्या मनातील नैराश्य दूर करून आयुष्यात सकारात्मकता देतो.
4 / 6
पश्चिम दिशा : पश्चिम दिशा ही मावळतीची दिशा असल्याने या दिशेला लावलेला पंचमुखी हनुमानाचा फोटो आपल्या आयुष्यातील अडचणी मावळतीकडे नेतो. अर्थात दुःख, दैन्य, दारिद्रय दूर करण्यासाठी या प्रतिमेची मदत होते.
5 / 6
दक्षिण दिशा : ज्यांच्या घरात आजारपण जात नसेल, आजारपणात पैसा खर्च होत असेल, घराला उतरती कळा लागली असेल तर दक्षिण दिशेला लावलेला हनुमंताचा फोटो त्या सर्व अडचणी दूर करण्यास मदत करतो. मुख्य म्हणजे वास्तूमधील सर्व सदस्यांना सुदृढ आयुष्य मिळते.
6 / 6
उत्तर दिशा : ही धनलाभाची दिशा म्हटली जाते. ज्यांचे पॆसे अडकले असतील, जुनी येणी बाकी असतील, काम करूनही योग्य मोबदला मिळत नसेल तर अशा लोकांनी उत्तर दिशेला पंचमुखी हनुमानाचा फोटो लावावा.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष