५० वर्षांनी होळीला शुभ योग: ११ राशींना लाभ, बोनस-पदोन्नती; नवीन नोकरी संधी, हाती पैसा खेळेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 14:47 IST
1 / 15Holi 2025 Astrology: गुरुवार, १३ मार्च २०२५ रोजी होळी आहे. होळी पाच दिवस साजरी केली जाते. होळीचा दुसरा दिवस धूलिवंदनाचा. शुक्रवार, १४ मार्च २०२५ रोजी धूलिवंदन आहे. फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते. संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो.2 / 15ज्योतिषशास्त्रानुसार, सन २०२५ मधील होळीला मीन राशीत चतुर्ग्रही योगासह अन्य अनेक अद्भूत योग जुळून येत आहेत. मीन राशीत बुध, शुक्र, राहु आणि नेपच्युन ग्रह विराजमान असून, या ग्रहांचा युती योग जुळून आला आहे. तसेच लक्ष्मी नारायण योगही जुळून येत आहेत. विशेष म्हणजे सन २०२५ च्या फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळीला चंद्रग्रहण असणार आहे.3 / 15१३ मार्च २०२५ रोजी शुक्र आणि मंगळ ग्रहाचा शतांक योग जुळून येत आहे. कन्या राशीत असलेल्या केतुचे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात गोचर होत आहे. मीन राशीत असलेला बुध १४ मार्च २०२५ रोजी वक्री होत आहे. ही एकूणच ग्रहस्थिती पाहता कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...4 / 15मेष: बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. पदोन्नतीची शक्यता आहे. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो. काही लोक धार्मिक यात्रेवर जाण्याची योजना आखू शकतील. गुंतवणुकीच्या दृष्टीनेही हा काळ शुभ आहे. फायदेशीर सौद्यांची संधी मिळू शकते.5 / 15वृषभ: नवीन मार्गांनी पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत किंवा व्यवसायात पगारवाढ किंवा बोनस मिळू शकतो. या काळात नवीन काम करण्याचा विचार येईल आणि त्यात यश मिळवू शकाल. आत्मविश्वास पूर्वीपेक्षा जास्त वाढेल. ज्या लोकांचे काम, व्यवसाय निर्यात आणि आयातीशी संबंधित आहे, त्यांना चांगला नफा मिळू शकतो. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकेल.6 / 15मिथुन: कामात आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना या वेळी पदोन्नती मिळू शकते. गुंतवणुकीच्या दृष्टीनेही हा काळ शुभ आहे. फायदेशीर सौद्यांची संधी मिळू शकते. नात्यात गोडवा येईल. या काळात बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना काही परीक्षेत यश मिळू शकते. पैशाच्या मिळकतीचे नवीन मार्ग तयार होऊ शकतील.7 / 15कर्क: सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कामाचे कौतुक होईल. आदर मिळेल. उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. करिअरशी संबंधित समस्या दूर होतील. काही लोकांना पदोन्नती मिळू शकते. व्यवसायाला नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकाल. नवीन ग्राहक आणि व्यावसायिक संबंध निर्माण होतील. विद्यार्थी असाल तर हा काळ शिक्षण क्षेत्रात यश मिळवून देऊ शकेल.8 / 15सिंह: वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कामाचे कौतुक होईल. आदर मिळेल. व्यक्तिमत्व सुधारेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळू शकते. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन अद्भूत ठरू शकेल.9 / 15कन्या: जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. यश मिळू शकते. जे लोक एखाद्यासोबत भागीदारीत काम करतात त्यांना या काळात त्यांच्या भागीदारांच्या मदतीने मोठे फायदे मिळू शकतात. या काळात आवड गाणी ऐकण्यात अधिक असू शकते.10 / 15तूळ: भाग्याची साथ मिळेल. काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. घर किंवा इतर कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता.11 / 15धनु: सुखसोयी वाढतील. कामाच्या ठिकाणी प्रयत्नांचे कौतुक केले जाईल. नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित परदेश दौऱ्याचे मजबूत संकेत आहेत. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच धनलाभाचे संकेत आहेत. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. कारकिर्दीत प्रगती होईल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायात चांगला नफा होऊ शकेल.12 / 15मकर: नोकरी किंवा व्यवसायात पगार वाढ किंवा बोनस मिळू शकतो. धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास तयार असाल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळू शकेल. एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. नोकरी करणाऱ्या लोकांना या वेळी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात.13 / 15कुंभ: वेळोवेळी अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. समाजात प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढेल. लोक गांभीर्याने घेतील. नवीन करारांमुळे व्यापाऱ्यांना फायदा होऊ शकेल. गुंतवणुकीसाठी हा योग्य काळ ठरू शकेल. अडकलेले पैसे मिळू शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. बोलण्याचा प्रभाव वाढू शकेल. लोक प्रभावित होतील. सकारात्मकता दिसून येईल. शिक्षण, उद्योग, विक्री आणि विपणन क्षेत्राशी संबंधित किंवा सल्लागार असलेल्यांसाठी हा काळ शुभ राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल.14 / 15मीन: आत्मविश्वास वाढेल. करिअरमधील प्रगती होऊ शकेल. स्वाभिमान वाढू शकेल. शारीरिक आणि मानसिक तणावापासून दिलासा मिळू शकतो. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन अद्भुत असेल. भागीदारीच्या कामातही फायदा होईल. पैसे वाचवण्यात यशस्वी होण्याची शक्यता आहे.15 / 15- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.