६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 09:12 IST
1 / 152026 New Year First Day Astrology: २०२६ इंग्रजी नववर्ष सुरू होत आहे. नववर्ष २०२६ च्या पहिल्याच दिवशी अद्भूत दुर्मिळ योग जुळून येत आहेत. गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत चतुर्ग्रही योग जुळून आलेला आहे. तसेच या वर्षाच्या पहिल्याच दिवशी चंद्र आपल्या उच्च राशीत म्हणजेच वृषभेत असणार आहे. धनु राशीतील चार ग्रहांमुळे चार प्रकारचे अतिशय शुभ, पुण्य फलदायी राजयोग जुळून आले आहेत.2 / 15ज्योतिषशास्त्राचीच एक शाखा असलेल्या अंकशास्त्रानुसार विचार केल्यास, नववर्ष २०२६ यातील आकड्यांची बेरीज १० येते. त्यामुळे या वर्षाचा मूलांक १ असणार आहे. नवग्रहांचा राजा मानल्या गेलेल्या सूर्य ग्रहाकडे मूलांक १ चे स्वामित्व आहे. त्यामुळे २०२६ हे वर्ष ऊर्जेचे वर्ष मानले गेले आहे. सूर्याचा अग्नि हे विधायक कामांचा अग्नि मानला गेला आहे.3 / 15नववर्षाचा पहिलाच दिवस हा अतिशय खास मानला जातो. नववर्षाचा पहिला दिवस हा आशेची एक नवी पहाट घेऊन सुरू होत असतो. एक नवीन सुरुवात होत असते. नवनवे संकल्प केले जातात. संपूर्ण वर्ष चांगले जावे, सुख मिळावे, भरभराट व्हावी, नोकरी, शिक्षण, करिअर, व्यवसाय, व्यापार, कुटुंब, आर्थिक आघाडीवर उत्तम यश आणि प्रगती व्हावी, अशी मनोकामना असते. नववर्षाची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल? सर्व बारा राशींवरील प्रभाव जाणून घेऊया...4 / 15मेष: खुशखबर मिळेल. काही अडचणी असतील. मात्र, थोडा संयम बाळगल्यास परिस्थिती तुमच्या आटोक्यात येण्यास वेळ लागणार नाही. प्रगतीला पूरक वातावरण राहील. मनात आनंदी विचार राहतील, प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. खाणे-पिणे, मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला एखादी खुशखबर मिळेल. व्यवसायात भरभराट होईल.5 / 15वृषभ: महत्त्वाची कामे करताना घाई करू नका. कुणाला जामीन राहणे शक्यतो टाळा, आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे आवश्यक आहे. मुलांशी संवाद ठेवा. त्यांच्या संगतीकडे लक्ष द्यावे. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. कायद्याची बंधने पाळा. शुक्रवार, शनिवार एखादे महत्त्वाचे काम यशस्वीपणे पूर्ण होईल. धनलाभ होईल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील.6 / 15मिथुन: उत्साह राहली. नवीन जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण कराल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. योजना लोकांना आवडतील. नवीन वर्षाचा पहिला दिवस संयमाने वागण्याची गरज आहे. या काळात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. तसेच मित्र संगतीकडे लक्ष द्यावे. शुक्रवार, शनिवार चांगले अनुभव येतील, कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे.7 / 15कर्क: संमिश्र ग्रहमान राहील. 'श्रद्धा आणि सबुरी' महत्त्वाची आहे हे विसरू नका. सुरुवातीला मोठ्या उत्साहात कामे हाती घ्याल. लोकांच्या टीका-टिप्पणीकडे दुर्लक्ष करून आपली वाटचाल सुरू ठेवा. मुलांची काळजी घ्यावी. नोकरीतील बदलांकडे सकारात्मक पद्धतीने बघा, नवीन वर्षाच्या सुरुवातीला एखाद्या व्यवहारात अचानक मोठा फायदा होईल. मात्र, उत्साहाच्या भरात पैशाची उथळपट्टी करणे टाळले पाहिजे.8 / 15सिंह: अनुकूल काळ. सबुरीचे धोरण ठेवा. चिडचिड करू नका. शांतचित्ताने कामे करत राहा. अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल. चांगले अनुभव येतील. थोरा-मोठ्यांच्या ओळखीचा फायदा होईल. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल, नवीन वर्षाच्या सुरुवातीला एखादे महत्त्वाचे काम होईल.9 / 15कन्या: चांगला काळ जाईल. सुरुवातीला काही कारणाने गैरसमजाचे वातावरण राहील, जीवनसाथीचे म्हणणे ऐकून घ्या. सावधपणे वागण्याची गरज आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. चंद्र भ्रमणामुळे अनुकूल फळे मिळतील. सामाजिक मान-सन्मान मिळेल, मौजमजा कराल. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल.10 / 15तूळ: गुंतवणूक फायद्याची ठरेल. कटू गोड अनुभव विसरू नका. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी लवकरच दूर होतील, सुरुवातीला काही अडचणी असतील, व्यवसायात चांगली तूळ परिस्थिती राहील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. वाहन जपून चालवा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, प्रवासात सतर्क राहा. मूल्यवान वस्तू, कागदपत्रे सांभाळा. अनुकूल परिस्थिती राहील, कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल.11 / 15वृश्चिक: भेटवस्तू मिळेल. सतत कशात ना कशात व्यस्त राहाल. नोकरीत पारडे जड राहील. अनेकांच्या सहकार्यामुळे नोकरीतील एखादे मोठे काम हातून पूर्ण होईल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. मात्र, संयमाने वागण्याची गरज आहे. योजना गुप्त ठेवा. भेटवस्तू मिळतील. जीवनसाथीशी गैरसमज होऊ शकतात. शुक्रवारी, शनिवारी अचानक धनलाभ होऊ शकतो. मात्र, वाहन जपून चालवा. इतरांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका.12 / 15धनु: लोकांचे सहकार्य मिळेल. सुरुवातीपासूनच ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल. नोकरीत सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. अडचणी सोडविण्यासाठी लोक तत्परता दाखवतील. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. लोकांना गृहीत धरून चालू नका. काही लोक तुमच्या विरोधात गुप्तपणे कारवाया करतील. शुक्रवारी, शनिवारी व्यवसायात भरभराट होईल. विवाह करण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे.13 / 15मकर: मुलांना यश मिळेल. ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. थोडा कामाचा ताण असला तरी यश मिळत गेल्याने कामाचे काही वाटणार नाही. नवीन काही तरी करून दाखविण्याची जिद्द राहील. जवळच्या सहलीला जाऊन याल. घरातील सदस्यांना वेळ द्याल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. शुक्रवारी, शनिवारी थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. जीवनसाथी मर्जीनुसार वागेल. आरोग्याची काळजी घ्यावी.14 / 15कुंभ: धनलक्ष्मीची कृपा, प्रसन्नता राहील. ठरवलेले प्रकल्प या काळात गती घेतील. नोकरीत प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. काहींना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. पगारवाढ व तत्सम लाभ होतील. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. मात्र, गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. सामाजिक कार्य करणाऱ्यांना अनुकूल वातावरण राहील.15 / 15मीन: नवीन संधी मिळेल. कर्तबगारीला वाव राहील. अनेक अडचणी दूर झाल्यामुळे स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एखादा प्रकल्प हाती घेऊन तो पूर्ण करण्यासाठी वेळ द्याल. व्यवसायात बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. नोकरीत नवीन संधी मिळेल. त्यातून बराच फायदा होईल. वरिष्ठांकडून प्रशस्तीपत्र मिळेल. घराची शोभा वाढविणाऱ्या वस्तू खरेदी कराल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.