शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 15:06 IST

1 / 15
Shani Mahadasha Rahu Antardasha: ज्योतिषशास्त्रात शनिचे स्थान अनन्य साधारण असेच आहे. पुराणात शनिबाबत अनेक मान्यता, कथा प्रचलित आहेत. नवग्रहांमध्ये शनि ग्रह हा सर्वांत कमी वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. शनिची साडेसाती ही सर्वाधिक प्रभावी मानली जाते. साडेसात वर्षांचा काळ अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जातो. परंतु, शनिची महादशा तब्बल १९ वर्षे सुरू असते, असे सांगितले जाते.
2 / 15
राहु आणि केतु या दोन ग्रहांना छाया ग्रह मानले जाते. राहु आणि केतु यांना नवग्रहांमध्ये स्थान असून, ते विशेष मानले जाते. कुंडलीतील राहु-केतु यांच्या स्थानांवरून व्यक्तींवरील प्रभाव पाहिला जातो. हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून सातव्या समसप्तक स्थानी असतात. राहु आणि केतु यांचे चलन कायम वक्री असते. ते कधीही मार्गी होत नाहीत. राहु महादशेचा काल सुमारे १८ वर्षांचा आहे.
3 / 15
एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला की, संपूर्ण आयुष्य कधी आणि कोणत्या ग्रहांच्या महादशा येणार आहेत, त्या किती वर्ष असणार आहेत. एका ग्रहाच्या महादशेत कोणत्या ग्रहाची अंतर्दशा येणार आहे आणि ती अंतर्दशा किती वर्ष असणार आहेत, याची एक यादीच देण्यात येते. जन्म वेळी जी कुंडली तयार होते, त्यावरून महादशा आणि अंतर्दशा यांचे गणित मांडले जाते.
4 / 15
शनि आणि राहु हे दोन्ही ग्रह अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. रंकाचा राजा बनवण्याची क्षमता दोन्ही ग्रहांत असल्याचे म्हटले जाते. शनि आणि राहु यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे मानले जाते. जेव्हा शनि महादशा सुरू असताना राहु अंतर्दशा येते, तेव्हा त्याचे अनेक सकारात्मक परिणाम दिसू शकतात, असे म्हटले जाते. कुंडलीत दोन्ही ग्रहांचे स्थान काय आहे, दोन्ही ग्रह कोणत्या राशीत आहेत, यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात.
5 / 15
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि आणि राहु नकारात्मक स्थितीत असतील तर त्यांना आयुष्यभर पैशाची कमतरता भासू शकते. अनेकदा आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते. परंतु, शनि आणि राहु शुभ स्थितीत असतील तर ते व्यक्तीला प्रचंड संपत्ती देऊ शकतात, असे म्हटले जाते.
6 / 15
कुंडलीत शनि निचीचा असेल, म्हणजेच नीच राशीत असेल तर, शनि महादशेत व्यक्तीला मानसिक आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. राहु ग्रह असाध्य आजारांना कारणीभूत ठरू शकतो. वेळेत आजाराचे निदान होत नाही. राहु मंगळासोबत असेल तर व्यक्तीवर मोठा आघात होऊ शकतो. शनि आणि चंद्र एकत्रितपणे विष योग निर्माण करतात, ज्यामुळे मानसिक आजार होऊ शकतात.
7 / 15
या उलट, शनि आणि राहु कुंडलीत शुभ किंवा उच्च स्थानी असतील, तर शनि महादशा आणि राहु अंतर्दशा काळात व्यक्तीची आर्थिक परिस्थिती सुधारते. सदर व्यक्तीला संपत्ती आणि मालमत्ता मिळू शकते. आदर आणि सन्मान मिळतो. एखादी व्यक्ती व्यापारी असेल तर तो मोठा व्यापारी बनतो. एखादी व्यक्ती राजकारणात सहभागी असेल तर ती निवडणूक जिंकू शकते. सत्तेची पदे मिळवू शकते. शेअर बाजार आणि लॉटरीमधून फायदा होऊ शकतो. शनि शुक्राच्या युतीत असेल तर कला आणि चित्रपट उद्योगात प्रसिद्धी मिळू शकते.
8 / 15
शनि हा मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहेत. तूळ ही शनिची उच्च रास आहे, तर मेष ही त्याची नीच रास मानली जाते. पुष्य, अनुराधा व उत्तराभाद्रपदा या तीन नक्षत्रांचे स्वामित्व शनिकडे आहे. अंकशास्त्राप्रमाणे ८ या मूलांकाचे स्वामित्व शनिकडे आहे. शनि हा माणसाचे मन स्वच्छ व शुद्ध करणारा, मनातील घाण व कुविचार टाकून उच्चप्रतिला नेणारा हा एकच ग्रह आहे.
9 / 15
शनि हा गुरु ग्रहाला अध्यात्मिक गुरु मानतो. जे याची अवज्ञा करतात त्यांना तो खाली ओढतो व माणसाच्या अहंकाराचा नाश करतो. जे शिस्तबद्ध, विनयशील, नम्र आहेत, त्यांना उच्च शिखरावर नेऊन बसवतो, अशी शनीची ख्याती सांगितली जाते.
10 / 15
राहु-केतु हे आकाशात दिसणारे ग्रह नाहीत. ते गणितसिद्ध बिंदू आहेत. ते ज्या ग्रहांबरोबर असतात, त्या ग्रहांना आपली शक्ती देतात अथवा त्या ग्रहांप्रमाणे फल देतात, अशी मान्यता आहे. राहु हा पापग्रह आहे. कन्या राशी ही याचे स्वगृह आहे. वृषभ ही मूलत्रिकोणराशी आहे. मिथुन उच्चरास आणि धनु ही नीचरास मानली गेली आहे. याची उपास्यदेवता कालिका आहे.
11 / 15
मूलांक ४ वर राहुचा अंमल असल्याचे मानले जाते. सत्तावीस नक्षत्रांपैकी आर्द्रा, स्वाती व शततारका या नक्षत्रांचे स्वामित्व राहुकडे आहे. बुध, शुक्र, शनि हे याचे मित्र आहेत तर रवि, चंद्र, मंगळ हे शत्रू आहेत. गुरुशी हा समत्वाने वागतो. गरिबालाही राजा करण्याची ताकद राहु ग्रहात असते, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते.
12 / 15
आताच्या घडीला शनि मीन राशीत आहे. मीन राशीचा स्वामी शनि आहे. मीन राशीत शनि जून २०२७ पर्यंत असणार आहे. शनि मीन राशीत विराजमान असल्यामुळे कुंभ, मीन आणि मेष राशीची साडेसाती सुरू आहे. कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा, मीन राशीचा साडेसातीचा दुसरा/मधला टप्पा आणि मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे.
13 / 15
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु ग्रह कोणत्या स्थानी आहे, राहुशी कोणत्या ग्रहाशी युती आहे का, राहुवर कोणत्या ग्रहाची दृष्टी पडते का, दृष्टी असेल, तर ती शुभ आहे की प्रतिकूल आहे, अशा अनेक गोष्टींचा विचार करून राहुचा त्या व्यक्तीवर प्रभाव कसा असेल, याबाबत भविष्यकथन केले जाऊ शकते.
14 / 15
शनि हा कर्मकारक ग्रह असून, राहु हा भरपूर धन व ऐहिक सौख्य देणारा ग्रह आहे. चांगले कर्मे केली, तर शनि चांगली फळे देतो, असे म्हटले जाते. शनि मंदगतीचा ग्रह असल्यामुळे शुभ फल मिळण्यास वेळ लागू शकतो. परंतु, जी फले मिळतात, ती अकल्पनीय, अनपेक्षित आणि अपूर्व अशीच असतात, असे सांगितले जाते.
15 / 15
- सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक