शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरफड त्वचेसाठी फायदेशीर! वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 5:34 PM

1 / 7
कोरफडीला 'वंडर प्लांट' म्हणूनही ओळखलं जातं. अनेक समस्यांवर कोरफड फायदेशीर ठरते हे आपण सारे जाणतोच. तसेच आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही कोरफड अत्यंत उपयोगी ठरते. यातील अॅन्टी-बॅक्टेरिअल गुणधर्म चेहऱ्याच्या अनेक समस्यांवर फायदेशीर ठरतात. पण फक्त कोरफडीचा योग्य वापर करण्याची पद्धत जाणून घेणं आवश्यक ठरतं.
2 / 7
कोरफडीचा चेहऱ्यावर वापर तुम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी करू शकता. कोरफड सनबर्न, मॉयश्चरायझर, मेकअप रिमूव्हर, अॅन्टी-एजिंग जेल, स्क्रब, आयब्रो जेल यासोबतच इतर समस्यांवरही फायदेशीर ठरतो.
3 / 7
जर तुम्ही सनबर्नसाठी याचा वापर करत असाल तर कोरफडीचं जेल काही वेळासाठी फ्रिजमध्ये ठेवा आणि त्यानंतर त्यामध्ये थोडसं गुलाब पाणी एकत्र करून चेहऱ्यावर लावा. दररोज रात्री चेहऱ्यावर लावून झोपा. काह दिवसांतच सनबर्नची समस्या दूर होइल.
4 / 7
चेहऱ्यावरील मृत पेशी म्हणजेच, डेड स्किन सेल्स दूर करण्यासाठी कोरफडीचं जेल लावण्यासाठी फेसवॉश आणि पाण्याने आपली त्वचा स्वच्छ करा. चेहऱ्यावर कोरफडीचं जेलची एक लेअर लावा आणि त्यानंतर हलक्या ओल्या कपड्याने स्क्रब करत पुसून घ्या.
5 / 7
अॅन्टी-एजिंग जेल म्हणून कोरफडीचा वापर करत असाल तर त्यामध्ये व्हिटॅमिन ई ऑइल आणि व्हिटॅमिन सी पावडर एकत्र करून लावा.
6 / 7
मेकअप स्वच्छ करण्यासाठी कॉटनवर कोरफडीचं जेल किंवा गर घेऊन मेकअप हलक्या हाताने स्वच्छ करा.
7 / 7
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.
टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स