महागडे स्पा नाही, तर शॅम्पू आणि साखरेने केस गळण्यापासून झटपट मिळवा सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 12:16 PM2020-03-20T12:16:04+5:302020-03-20T12:30:58+5:30

धूळ आणि प्रदुषणामुळे आपले केस खराब होत असतात. प्रत्येक मुलीला असं वाटत असतं की आपले केस लांब आणि चमकदार असावेत पण सध्याच्या वातावरणात केसांना चांगल ठेवणं खूप कठीण आहे.

पार्लरमध्ये जाऊन सतत महागडे स्पा आणि ट्रिटमेंट्स करून सुद्धा फायदा मिळत नाही आज आम्ही तुम्हाला काही खास उपाय सांगणार आहोत. ज्या उपायांचा वापर करून तुम्ही चांगले केस कोणताही खर्च न करता मिळवू शकता.

त्यासाठी तुम्हााला कोणतेही वेगळी मेहनत घ्यावी लागणार नाही. तुम्ही केस धुण्यासाठी जेव्हा शॅम्पूचा वापर करत असता फक्त त्यावेळी शॅम्पूमध्ये तुम्हाला साखर मिसळावी लागेल.साखरेचा आणि शॅम्पूचा वापर करून तुम्ही आपल्या केसांचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. त्यामुळे तुमचे केस मऊ सुद्धा राहतील.

असा करा वापर-हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी शॅम्पू एखाद्या वाटीत काढून घ्या, त्यानंतर त्यात एक चमचा साखर मिसळा. नंतर हे मिश्रण केसांना लावा. हे मिश्रण केसांना लावून मसाज करा. मग केस धुवून टाका.

केसांच्या मजबूतीसाठी- जर तुम्हाला तुमचे केस लांब आणि मजबत हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला तुमचे केस चांगले ठेवावे लागतील. त्यासाठी शॅम्पूमध्ये साखर मिसळून केसांवर चोळा. नंतर केस धुवून टाका. त्यामुळे तुमचे केस दाट आणि मजबूत होतील.

लांब केसांसाठी- जर तुमच्या केसांची वाढ कमी असेल तर हे मिश्रण आठवड्यातून एकदा लावल्यास फरक दिसून येईल. त्यामुळे केस लांब आणि दाट होण्यास मदत होईल.

कोरड्या केसांसाठी सुद्धा हे मिश्रण फायदेशीर आहे. साखर आणिु शॅम्पूचं मिश्रण लावल्याने केस चांगले राहतील. शिवाय केसांमधील कोंडा निघून जाण्यास मदत होईल.

पुळ्या येत नाही- उन्हाळ्यात केसांमध्ये खाज येणं, घामोळ्या होणं, पुळ्या येणं अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे स्काल्प खराब होत असतो. केस गळण्याची समस्या सुद्धा उद्भवत असते. म्हणूनच केसांची काळजी घ्यायची असेल तर साखरेचा आणि शॅम्पूचा वापर योग्यरितीने करणं गरजेचं आहे.

केसांची काळजी घेण्यासाठी पार्लरपेक्षा सोपा उपाय हा आहे. या उपायाचा वापर करून तुम्ही केस चांगले ठेवू शकता.