स्प्लिट एन्ड्स ला करा बाय-बाय; वापरा 'हे' घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 04:53 PM2019-08-06T16:53:50+5:302019-08-06T17:02:50+5:30

पावसाळ्यात केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. केस गळणं, केस दुभंगण यांसारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यांपैकी केसांना फाटे फुटण्याची समस्या अशी असते ज्याकडे जर बराच वेळ दुर्लक्ष केलं तर केस कापण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. अशातच जर तुम्हाला अजिबात केस कापायचे नसतील तर आज आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय स्पिट ऐन्डपासून सुटका मिळवू शकता.

गुलाब पाण्यामध्ये असलेल्या हिलिंग प्रॉपर्टिज त्वचेसोबत केसांसाठीही फायदेशीर ठरतात. तसेच केस दुभंगण्याची समस्या दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. यासाठी 4 चमचे गुलाब पाण्यामध्ये एक चमचा मध आणि 8 चमचे पाणी एकत्र करा. सर्व गोष्टी व्यवस्थित एकत्र करून केसांना आणि खासकरून केसांच्या टोकांना लावा. एक तासासाठी तसचं ठेवा. त्यानंतर माइल्ड शॅम्पूने धुवून टाका.

लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करून तयार केलेलं मिश्रण नॅचरल कंडिशनर म्हणून काम करतं आणि केस तुटण्यापासून वाचवतं. शॅम्पू केल्यानंतर या मिश्रणाने केस धुवून घ्या. जेव्हा जेव्हा तुम्ही शॅम्पू कराल त्यावेळी हा उपाय करा. लवकरच तुम्हाला फरक जाणवेल.

व्हिटॅमिन ई, मिनरल्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स मुबलक प्रमाणात असतात. जे केसांमधील मॉयश्चर लॉक करून केसांना डॅमेज होण्यापासू वाचवतो. यासाठी अर्धा अवोकाडोचा गर आणि एक चमचा बदामाचं तेल एकत्र करून स्मूद पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट केस आणि स्काल्पला लावा. काही वेळ तसचं ठेवून माइल्ड शॅम्पूने धुवून टाका.

केस धुतल्यानंतर टॉवेलच्या मदतीने अलगद कोरडे करा. केस कोरडे करण्यासाठी कॉटन टि-शर्टचाही वापर करू शकता. टॉवेलमध्ये केस गुंडाळण्याऐवजी टी-शर्टमध्ये ओले केस गुंडाळून ठेवू शकता. यामुळे केस तुटणार नाहीत तसेच दुभंगणारही नाहीत.

केसांना तेल लावणं हा केसांचं सौंदर्य जपण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. एका बाउलमध्ये थोडसं खोबऱ्याचं तेल गरम करा आणि केसांच्या मुळांना लावा आणि शॉवर कॅप घालून जवळपास अर्ध्या तासासाठी ठेवा. यामुळे तेलातील सर्व गुणधर्म केसांमध्येच मुरतील. त्यानंतक केस शॅम्पूच्या मदतीने धुवून घ्या. तुम्हाला काही दिवसांमध्येच फरक दिसून येईल.

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.