जपान ओपन सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे चारही बॅडमिंटनपटू पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 21:26 IST2017-09-22T19:09:30+5:302017-09-22T21:26:37+5:30

जपान ओपन सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या चारही बॅडमिंटनपटूंचे आव्हान संपुष्टा आले आहे. पीव्ही सिंधूचा जपानच्या ओकुहाराने १८-२१, ८-२१ असा पराभव केला.
लंडन ऑलिम्पिकची कांस्य विजेती भारताची फुलराणी सायना नेहवालचा कॅरोलिना मारिनने १६-२१, १३-२१ अशा फरकाने पराभूत केले.
स्पर्धेत आठवे सीडींग मिळालेल्या किदाम्बी श्रीकांतला वर्ल्ड चॅम्पियन व्हिक्टर एक्सेलसने 21-17,21-17 असे पराभूत केले.
चीनच्या शी युगूने उपांत्यपूर्व फेरीत प्रणयचा 15,21, 14-21 असा पराभव केला.