हाँगकाँग ओपन- पी.व्ही.सिंधूची फायनलमध्ये धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 22:03 IST2017-11-25T22:00:17+5:302017-11-25T22:03:31+5:30

भारताची स्टार बॅडमिंटन प्लेअर पी.व्ही सिंधूने हाँगकाँग ओपन सुपर सीरिजच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

शनिवारी हाँगकाँगमध्ये झालेल्या सेमीफायनलमध्ये सिंधूने थायलंडच्या रतचानोक इंतानोनचा पराभव केला.

43 मिनिट चाललेल्या या सामन्यात सिंधूने रतचानोक इंतानोनचा 21-17, 21-17 ने पराभव केला.

रविवारी हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटनची फायनल मॅच रंगणार आहे.अंतिम फेरीत सिंधूसमोर चायनिज तैपईच्या ताई त्झू-यिंग हिचं आव्हान आहे.