Yamaha Fascino 125 FI Hybrid: देशातील पहिली हायब्रिड स्कूटर लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 03:28 PM2021-07-24T15:28:10+5:302021-07-24T15:33:29+5:30

Yamaha Fascino 125 FI Hybrid launched, price, features: लेटेस्ट अपडेटबरोबरच अनेक बदल या स्कूटरमध्ये पहायला मिळतात. नव्या स्कूटरमध्ये नवीन लुक देण्यात आली आहे. तसेच नवीन रंगात ही उपलब्ध करण्यात आलीआहे.

Yamaha Fascino 125 FI Hybrid launched in india Know Colours and Price: जपानची मुख्य वाहन निर्माता कंपनी Yamaha ने देशातील पहिली हायब्रिड स्कूटर Yamaha Fascino 125 FI Hybrid लाँच केली आहे.

Yamaha Fascino 125 FI ही डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक अशा दोन स्वरुपात येते. डिस्क ब्रेक स्कूटरची एक्सशोरुम किंमत 76,530 रुपये ठेवण्यात आली आहे. तर ड्रम ब्रेक व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 70,000 रुपये ठेवण्यात आली आहे.

लेटेस्ट अपडेटबरोबरच अनेक बदल या स्कूटरमध्ये पहायला मिळतात. नव्या स्कूटरमध्ये नवीन लुक देण्यात आली आहे. तसेच नवीन रंगात ही उपलब्ध करण्यात आलीआहे.

नव्या Fascino 125 FI हायब्रिड स्कूटरमध्ये स्मार्ट मोटर जनरेटर (SMG) सिस्टिम मिळते. एसएमजी एका इलेक्ट्रीक मोटरसारखे काम करते.

स्कूटर उभी असताना पुढे जाण्यासाठी वेग पकडण्यासाठी ही सिस्टिम इंजिनला मदत करते. यामहानुसार ही प्रणाली टेंडेम रायडिंग मध्ये किंवा चढाच्या सुरुवातीला अॅक्सलरेशनवेळी स्कूटरचे डगमगने कमी करण्याचे काम करते.

Fascino 125 ला ताकद देण्यासाठी कंपनीने हायब्रिड टेक्नॉलॉजीसह एक रिफ्रेश इंजिन दिले आहे. हे इंजिन 8.6 bhp ची ताकद आणि 10.3Nm पीक टॉर्क निर्माण करते. स्कूटरच्या आधीच्या मॉडेलमध्ये इंजिन 8.4 bhp ताकद आणि 9.7 Nm पीक टॉर्क निर्माण होत होते. यामध्ये एक सायलंट स्टार्टर देखील मिळतो.

हे तंत्रज्ञान सायलंट इंजिन इग्निशनला मदत करते. म्हणजेच आवाज न करता इंजिन सुरु होते. हे फीचर भारतात काही 125 सीसीच्या स्कूटरमध्ये मिळते.

नव्या 2021 Fascino 125 मध्ये अन्य फीचर्समध्ये देखील बदल झालेले आहेत. स्कूटरच्या हायर-स्पेक डिस्क ब्रेक वर्जनमध्ये ब्ल्यूटूथ सोबत Connect X app सह महत्वाचे फीचर देणयात आले आहेत.

एलईडी हेडलाइट्स, डीआरएल, एलईडी टेललाइट, डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, पावर असिस्टसोबत हायब्रिड टेक्नॉलॉजीचे इंजिन, डिस्क ब्रेक आहे. राईड असिस्ट फीचरमध्ये साईड स्टँड इंजन कट ऑफ स्विच मिळतो. हा यामहाच्या स्कूटरमध्ये स्टँडर्ड आहे.

विविड रेड स्पेशल, डार्क मॅट ब्लू, सुवे कॉपर, यलो कॉकटेल, मॅट ब्लॅक स्पेशल, कूल ब्लू मेटॅलिक, सियान ब्लू, विविड रेड आणि मॅटेलिक ब्लॅक अशा विविध रंगसंगतीत ही स्कूटर उपलब्ध करण्यात आली आहे.

टॅग्स :यामहाyamaha