Windshield Frits: कारच्या विंडशिल्डवर हे ब्लॅक डॉट्स का असतात? उपयोग वाचून हैराण व्हाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 11:36 AM2023-01-03T11:36:44+5:302023-01-03T11:41:37+5:30

तुम्हाला वाटत असेल की ही एक डिझाईन आहे, पण तसे नाहीय. विमानाच्या खिडकीच्या काचेला एक छोटासा होल का असतो हे तुम्हाला आता कळलेच असेल.

विमानाच्या खिडकीच्या काचेला एक छोटासा होल का असतो हे तुम्हाला आता कळलेच असेल. परंतू, तुम्ही नेहमी कार वापरता किंवा पाहता परंतू त्या कारच्या विंडशिल्डवर असलेले ब्लॅक डॉट्स हे कशासाठी असतात हे नक्कीच माहिती नसेल. बस फक्त असतात, काच पुसताना पाहिले असेल, वरून पाऊस पडत असताना आभाळाकडे पाहताना पाहिले असेल... है तो छोटीसी चीज लेकीन बडे काम की....

खूप कमी लोकांना कारच्या विंडशिल्डवरील या ब्लॅक डॉट्सबद्दल माहिती असेल. तुम्हाला वाटत असेल की ही एक डिझाईन आहे, पण तसे नाहीय. याचा उपयोग वाचून तुम्ही हैराण व्हाल, कारण विंडशिल्डवर हे छोटे ठिपके खूप गरजेचे असतात.

कारच्या काचेवर असलेल्या ठिपक्यांना विंडशिल्ड फ्रिट्स (Windshield Frits) म्हणतात. हे छोटेसे जरी असले तरी ते विंडशिल्डला एका ठराविक जागेवर ठेवण्यास मदत करतात. कार वेगात असताना किंवा खड्ड्यात धक्का बसला तर विंडशिल्डला निखळण्यापासून ते रोखतात. ये ठिपके नसतील तर कारची कार निखळेल आणि फ्रेममधून बाहेर पडेल किंवा फुटेल.

या काळ्या ठिपक्यांमुळे गाडीचा लूकही खूप प्रभावी दिसतो. सूर्य प्रखर असतानाही हे ठिपके कारमधील तापमान कमी करण्यास मदत करतात. हे ठिपके काच आणि गोंद यांच्यातील मजबूत पकड म्हणून काम करतात.

सूर्यप्रकाशामुळे गोंद खराब होण्याची शक्यता असते. प्रखर सूर्यप्रकाशातही गोंद वितळण्याची शक्यता असते, त्यापासून ते वाचवितात. यामुळे विंडशील्ड आणि खिडकीची काच घट्टपणे फ्रेममध्ये बसविलेल्या जागेवर राहते.

जर हे जर काळे ठिपके कमी होऊ लागले किंवा पुसट होऊ लागले तर ते लवकरात लवकर दुरुस्त करावेत. नाहीतर काच सैल होऊ शकते. बहुतांशवेळा असे होत नाही, परंतू वेळोवेळी याकडे लक्ष द्या.

जर हे काळे ठिपके फिकट होत असतील किंवा हळूहळू लुप्त होत असतील, तर तुम्हाला तुमची संपूर्ण विंडशील्ड बदलण्याची गरज नाही. जर काच फुटली असेल किंवा गॅप वाढली असेल तर तुम्हाला नक्की काच बदलण्याची गरज वाटेल. यासाठी सर्व्हिस सेंटरचा सल्ला घ्या.

टॅग्स :कारcar