By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 10:24 IST
1 / 8आजकालच्या आधुनिक डिझेल गाड्यांमध्ये (BS6) प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी DPF चा वापर केला जातो. मात्र, अनेकदा कारच्या डॅशबोर्डवर 'DPF Clogged' असा सिग्नल येतो आणि गाडीचा पिकअप कमी होतो. 2 / 8वेळीच लक्ष न दिल्यास हा फिल्टर बदलावा लागतो, ज्याचा खर्च ५० हजार ते १ लाखांपर्यंत असू शकतो. तुमचा डीपीएफ का खराब होतो, याची ५ प्रमुख कारणे समोर आली आहेत.3 / 8कमी अंतराचा प्रवास : जर तुम्ही तुमची डिझेल कार फक्त ५-१० किलोमीटरच्या छोट्या अंतरासाठी वापरत असाल, तर इंजिन पूर्णपणे गरम होत नाही. परिणामी, कार्बनचे कण जळून जाण्याऐवजी फिल्टरमध्ये साचून राहतात.4 / 8कमी वेग आणि ट्रॅफिक : शहरात सततच्या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवल्यामुळे इंजिनचे तापमान वाढत नाही. डीपीएफ साफ होण्यासाठी (Regeneration) गाडी ठराविक वेळ वेगाने चालवणे आवश्यक असते.5 / 8चुकीचे इंजिन ऑईल : डिझेल इंजिनसाठी विशिष्ट प्रकारचे लो-ॲश ऑईल वापरणे गरजेचे असते. साधे ऑईल वापरल्यास त्यातील रसायने फिल्टरमध्ये अडकतात.6 / 8इंधन गुणवत्ता : हलक्या दर्जाचे किंवा भेसळयुक्त डिझेल वापरल्यामुळे जास्त प्रमाणात धूर निघतो आणि फिल्टर लवकर भरतो.7 / 8इन्जेक्टरमधील बिघाड : जर इंजिनचे फ्युएल इन्जेक्टर खराब असतील, तर ते जास्त डिझेल सोडतात, ज्यामुळे अपूर्ण ज्वलन होऊन कार्बनचे प्रमाण वाढते.8 / 8डीपीएफ सुरक्षित ठेवण्यासाठी महिन्यातून किमान एकदा हायवेवर ६०-७० किमी वेगाने २०-३० मिनिटे गाडी चालवा, जेणेकरून 'ऑटो रिजनरेशन' प्रक्रियेद्वारे कचरा जळून जाईल.