ड्रायव्हिंग लायसनचे नुतनीकरण केले नाही तर काय होईल?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 02:45 PM2019-11-24T14:45:13+5:302019-11-24T14:49:37+5:30

वाहन चालक परवाना पहिल्य़ांदा काढताना त्यावर मुदत दिलेली असते. ही मुदत काही वर्षे असल्याने बऱ्याचजणांच्या लक्षात राहत नाही.

अशातच अखादा अपघात झाला किंवा वाहतूक पोलिसांनी पकडल्यास अडचणीचे ठरते. विम्याची रक्कम मिळत नाही. यामुळे लायसनच्या मुदतीची तारिख आधी पहावी.

नव्या मोटार वाहन कायद्यामध्ये लायसनचे नुतनीकरण करण्याचा कालावधी पाच वर्षांवरून एक वर्षावर आणण्यात आला आहे. लायसन नुतनीकरण केले नाही याचा अर्थ तुम्ही वाहन चालविणे विसरला किंवा चालवायला येत नाही असा होत नाही. तर लायसन म्हणजे तुम्हाला कायदेशीर वाहन चालविण्याची परवानगी असते.

नव्या कायद्यानुसार कोमताही व्यक्ती लायसन संपल्यानंतर एका वर्षाच्या आत नुतनीकरणासाठी अर्ज करू शकतो. असे केल्यास त्याच्याकडून काही फी आकारली जाते आणि लायसनची मुदत वाढविली जाते.

जर लायसनची मुदत संपून एक वर्ष लोटले असल्यास नव्या नियमानुसार तुम्हाला पुन्हा टेस्ट द्यावी लागणार आहे. सप्टेंबरपर्यंत ही मुदत पाच वर्षे होती. आता ती एक वर्षावर आली आहे.