माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
1 / 10Vayve Eva : भारतात गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक गाड्यांची(स्कूटर, बाईक, कार) मागणी वाढत आहे. यामुळे कंपन्यादेखील विविध EV गाड्या लॉन्च करत आहे. पण, बहुतांश इलेक्ट्रीक कारच्या किमती जास्त असल्यामुळे त्या सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. अशातच एक अशीही कंपनी आहे, जिने भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. विशेष म्हणजे, ही इलेक्ट्रिक कार फक्त 5 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 50 किमी पर्यंतची रेंज देते. तर, या देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची पूर्ण रेंज 250 किमी आहे.2 / 10या कारचे नाव Vayve Eva आहे, जी पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीने बनवली आहे. या कारची प्री-बुकिंग सुरू झाली असून, लवकरच ही छोटी आणि स्वस्त इलेक्ट्रिक कार भारतातील रस्त्यांवर धावताना दिसेल. या कारमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत, जी तिला इतरांपेक्षा खास बनवतात.3 / 10Vayve Eva तीन प्रकारच्या बॅटरी पॅकसह सादर करण्यात आली आहे. यामध्ये 9 kWh बॅटरी पॅक एका चार्जमध्ये 125 किमीची रेंज देतो, 12.6 kWh बॅटरी पॅक 175 किमीची रेंज देतो आणि 18 kWh बॅटरी पॅक 250 किमीपर्यंतची रेंज देतो.4 / 10तुम्ही ही कार घरी (एसी चार्जर) चार्ज केली, तर ती 10 ते 90 टक्के चार्ज होण्यासाठी 5 तासांचा वेळ लागेल. तर डीसी चार्जरवर ही कार फक्त 5 मिनिटांत चार्ज होते आणि तुम्हाला 50 किमीची रेंज देते. तर 10 ते 70 टक्के चार्ज होण्यासाठी फक्त 20 मिनिटे लागतात.5 / 10सूर्यप्रकाशाने चालणार- या कारची खासियत म्हणजे, Vayve Eva च्या छतावर सौर पॅनेल लावण्यात आले आहेत. यामुळे कारला 10 किमीची अतिरिक्त रेंज मिळते. अशाप्रकारे, ही कार तुम्हाला एका वर्षात 3000 किमी मोफत प्रवास देते.6 / 10ही कार रियर व्हील ड्राइव्ह मोटरवर चालते. ही फक्त 5 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडते. तिचा कमाल वेग 70 किमी प्रतितास पर्यंत जातो, ज्यामुळे ही शहराच्या प्रवासासाठी एक उत्तम कार बनते.7 / 10Vayve Eva इलेक्ट्रिक कार लहान कुटुंबासाठी परिपूर्ण आहे. त्याचा आकार खूपच कॉम्पॅक्ट आहे आणि हॅचबॅक कारपेक्षा लहान आहे. यामुळे लहान आणि अरुंद रस्त्यांवरून जाणे देखील शक्य आहे.8 / 10या कारची लांबी 2950 मिमी आहे, तर रुंदी फक्त 1200 मिमी आहे. यात 1590 मिमी इतकी उंच हेडरुम मिळेल. या कारमध्ये समोर ड्रायव्हर सीट आहे आणि मागे दोन लोक, म्हणजेच एकूण 3 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. 9 / 10आकाराने लहान असूनही या कारमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये तुम्हाला ड्युअल टचस्क्रीन, 6-वे पॉवर ड्रायव्हर सीट, पॉवर विंडो, पार्किंग सेन्सर, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले, रिअर कॅमेरा, की-लेस एंट्री, फिक्स्ड ग्लास सनरूफ सारखे अद्भुत फीचर्स मिळतात. कंपनी टॉप व्हेरियंटमध्ये क्लायमेट कंट्रोल आणि चिलर देखील देते.10 / 10कारच्या 9 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅक व्हेरिएंट 'नोव्हा' ची किंमत 3.25 लाख रुपये आहे. 12.6 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी असलेल्या 'स्टेला' मॉडेलची किंमत 3.99 लाख रुपये आणि 18 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅक असलेल्या 'वेगा' मॉडेलची किंमत 4.49 लाख रुपये आहे.