शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

... तरी तुम्हाला होऊ शकतो २५ हजारांचा दंड आणि तुरुंगवास, पाहा वाहतुकीचा 'हा' नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2022 8:52 AM

1 / 6
तुमच्याकडेही कार किंवा मोटरसायकल असेल तर काळजी घ्या. असे होऊ शकते की तुम्ही कार किंवा बाईक चालवत नसाल तरीही तुमच्या नावावर 25,000 रुपयांची पावती फाटू शकते. वास्तविक, जर एखादा अल्पवयीन व्यक्ती तुमची कार किंवा बाईक चालवताना आढळला, तर तुम्हाला 25,000 रुपयांचा दंड, 3 वर्षांचा तुरुंगवास आणि वाहनाची नोंदणी रद्द केली जाऊ शकते.
2 / 6
इतकेच नाही तर अल्पवयीन मुलाविरुद्ध बाल कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. जर एखादा अल्पवयीन व्यक्ती तुमचे वाहन चालवत असेल आणि ते वाहतूक पोलिसांच्या लक्षात आले, तरी तुमच्यावर कारवाई होऊ शकते. यासाठी तुम्हाला दंड आणि तुरुंगवास दोन्ही होऊ शकतो.
3 / 6
18 वर्षांखालील मुले जेव्हा स्कूटी, बाईक किंवा कार घेऊन घराबाहेर पडण्याचे प्रकार बहुतेक घरांमध्ये दिसून येतात. घरातील वडिलधारी मंडळी त्यांना हे करण्यापासून रोखतात पण ते मानत नाहीत. असे करणे कधीकधी अंगलट येऊ शकते. असे केल्याने मुले स्वतःसाठी धोका निर्माण करतात. मुलांनी आणि तुम्ही दोघांनीही वाहतूक नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
4 / 6
दिल्लीत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत जिथे अल्पवयीन मुले गाडी चालवताना पकडली गेली आहेत. अशा अनेक प्रकरणांमध्ये वाहतूक पोलिसांनी पावती फाडली आहे. याशिवाय काचांवर काळी फिल्म लावणे, सीट बेल्ट न लावणे आणि अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवणे यासाठी चालान कापण्यात आले आहे.
5 / 6
तुम्हाला दंड ठोठावण्यात आला आहे का हेदेखील तुम्ही पाहू शकता. https://echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जा. येथे चालान वर क्लिक करा आणि तुम्ही तुमचे चालान कापले आहे की नाही ते येथे तपासू शकता. तुम्हाला चालान क्रमांक, वाहन क्रमांक आणि वाहन चालविण्याचा परवाना क्रमांक मिळेल. येथे तुमचा तपशील प्रविष्ट करा आणि 'गेट डिटेल्स' वर क्लिक करा. तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल.
6 / 6
https://echallan.parivahan.gov.in/ वर जा. येथे चालान संबंधित माहिती भरा आणि तपशीलावर क्लिक करा. येथे तुम्हाला ऑनलाइन चलन भरावे लागेल.
टॅग्स :carकारtraffic policeवाहतूक पोलीस