Top 5 Biggest Car Companies In The World: जगातील टॉपच्या कार कंपन्या कोणत्या? मारुतीचा नंबर लागतो का? पहा लिस्ट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 15:28 IST2022-08-28T15:24:18+5:302022-08-28T15:28:45+5:30
जगातील सर्वात मोठी ऑटो कंपनी कोणती असा जर कोणी प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल?

जगातील सर्वात मोठी ऑटो कंपनी कोणती असा जर कोणी प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल? मारुती सुझुकी तर नाही ना? असा प्रश्न तुम्हालाच काही वेळ पडेल किंवा माहित नाही... पण मारुतीचा दबदबा फक्त भारतातच आहे. जगभरात दबदबा असलेल्यांमध्ये फोक्सवॅगन, टोयोटा यांचा नंबर लागतो.
Volkswagen AG ही कार कंपनी जगातील सर्वात मोठी कार कंपनी आहे. ही कंपनी फोक्सवॅगन, ऑडी, पोर्श, लॅम्बॉर्गिनी, बेंटली, बुगाटी, स्कोडासह अन्य लोकप्रिय ब्रँडच्या कार विकते. गेल्या वर्षी या कंपनीने ८९ लाख कारचे उत्पादन घेतले होते. ही कंपनी मुळची जर्मनीची आहे. या कंपनीला ८५ वर्षे झाली आहेत. जगभरात या कंपनीचे तीन लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. या कंपनीचा महसूल 264 अब्ज डॉलर्स एवढा आहे.
Toyota Motor Corporation
दुसरा नंबर जपानचा लागतो. जपानची टोयोटा कंपनी Toyota, Lexus, Ranz, Daihatsu आणि Hino सारखे ब्रँडच्या कार विकते. गेल्या वर्षी कंपनीने जगभरात ९५ लाख कार विकल्या. कंपनीचा महसूल 258.7 अब्ज डॉलर्स होता. जगभरात या कंपनीचे 3,66,000 कर्मचारी आहेत. पहिल्या दोन कंपन्यांमध्ये दरवर्षी कडवी स्पर्धा लागलेली असते. महसुलावरून हे नंबर काढलेले आहेत. उत्पादनावरून टोयोटा जगातील सर्वात मोठी कंपनी ठरते.
Mercedes Benz AG
मर्सिडीज ही कार कंपनी कोणाला माहिती नाहीय असे नाही. गरीबातल्या गरीबाला मारुती आणि मर्सिडीज या कार कंपन्या ज्ञात आहेत. या कंपनीची सुरुवात ९६ वर्षांपूर्वी झाली होती. या कंपनीचे Mercedes-Benz आणि स्मार्ट सारखे ब्रँड आहेत. गेल्या वर्षी या कंपनीने 2.8 लाख उत्पादित केल्या होत्या. या कंपनीचा महसूल टोयोटा, फोक्सवॅगनच्या उत्पादन आणि उत्पन्नाच्या तुलनेत खूपच जास्त आहे. 182.5 अब्ज डॉलर्स एवढी कमाई ही कंपनी करते. या कंपनीकडे 2.88 लाख कर्मचारी काम करतात.
Ford
भारतातून पळालेली अमेरिकेची फोर्ड मोटर्स ही कंपनी चौथ्या क्रमांकावर आहे. तिच्याकडे Ford आणि Lincoln सारखे कार ब्रँड आहेत. फोर्डची सुरुवात ११८ वर्षांपूर्वी झाली होती. गेल्या वर्षी फोर्डने जगभरात ४२ लाख कार बनविल्या होत्या. या कंपनीचा महसूल हा 127.1 अब्ज डॉलर्स एवढा आहे. जगभरात 1.86 लाख कर्मचारी आहेत.
Honda Motor Company
जगातील सर्वात बलाढ्य कंपन्यांमध्ये जपानची आणखी एक कंपनी आहे. होंडा मोटर्सचे होंडा आणि अॅकुरा असे दोन ब्रँड आहेत. 1948 मध्ये या कंपनीची स्थापना झाली होती. गेल्या वर्षी या कंपनीने ४४ लाख कारचे उत्पादन केले होते. जगभरात या कंपनीचे 2,11,000 कर्मचारी आहेत. तर महसूल 125.2 अब्ज डॉलर्स एवढा आहे.