Cheapest Electric Cars In India : इलेक्ट्रीक कार घ्यायचा विचार करताय? 'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त EV, एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 16:31 IST
1 / 8भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रीक कारच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रीक कार्सना चांगली मागणी मिळत आहे. यासोबतच Citroen आणि Mahindra च्या इलेक्ट्रीक कार्सही हळूहळू बाजारात आपलं स्थान निर्माण करत आहेत. 2 / 8MG मोटर इंडिया इंडियानंही आता नवी कॉम्पॅक्ट इलेक्ट्रीक कार कॉमेट ईव्ही सादर केली आहे. सध्या अनेक कंपन्या आपल्या इलेक्ट्रीक कार्स बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. जर तुम्ही इलेक्ट्रीक कार विकत घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.3 / 8ज्यांना नवीन इलेक्ट्रीक कार घ्यायची आहे त्यांच्यासाठी आम्ही भारतीय बाजारात विकल्या जाणाऱ्या 5 स्वस्त इलेक्ट्रीक कारच्या किंमती आणि फीचर्सबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. पाहूया कोणत्या आहेत या कार्स.4 / 8Tata Tiago EV - देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार म्हणजे Tata Tiago EV. याची एक्स-शोरूम किंमत 8.69 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 11.99 लाख रुपयांपर्यंत जाते. या इलेक्ट्रीक हॅचबॅकमध्ये 19.2 KWh बॅटरी देण्यात आलीये, जी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 250 किमीपर्यंत रेंज देते.5 / 8Tata Tigor EV - Tata Tigor EV ची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख ते 13.75 लाख रुपये आहे. Tigor EV ची बॅटरी 26 kWh क्षमतेची आहे आणि ही कार सिंगल चार्जवर 315 किमी पर्यंत धावते.6 / 8Tata Nexon EV Price - Tata Nexon EV Nex ची किंमत 16.49 लाख रुपये एक्स-शोरूमपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 19.54 लाख रुपये आहे. ही इलेक्ट्रीक एसयूव्ही 8 व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. Nexon EV Max मध्ये 40.5 kWh बॅटरी देण्यात आली असून ही सिंगल चार्जवर453 किमी पर्यंत धावते.7 / 8Citroen eC3 - Citroen ची भारतीय बाजारपेठेतील पहिली कार, Citroen EC3 ची एक्स-शोरूम किंमत 11.50 लाख रुपयांपासून सुरू होते आणि तिच्या टॉप व्हेरियंटची किंमत 12.76 लाख रुपये आहे. या इलेक्ट्रीक हॅचबॅकमध्ये 29.2 kWh बॅटरी देण्यात आली असून ही कार सिंगल चार्जवर 360 किमीची रेंज देते.8 / 8Mahindra XUV400 Price - महिंद्रा अँड महिंद्राची इलेक्ट्रीक SUV Mahindra XUV400 ची एक्स-शोरूम किंमत 15.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 18.99 लाख रुपये आहे. या इलेक्ट्रीक एसयूव्हीमध्ये 34.5 kWh ची बॅटरी देण्यात आलीये. सिंगल चार्जवर ही कार 375 किमी पर्यंत धावू शकते.