शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फुल टँकवर १००० KM रेंज; ५० हजारांच्या डाउन पेमेंटवर घरी घेऊन या Tata ची दमदार हॅचबॅक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 13:32 IST

1 / 6
Tata Tiago on EMI: तुम्ही खिशाला परवडणारी, दमदार आणि जास्त मायलेज देणाऱ्या कारच्या शोधात असाल, Tata Tiago हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. जीएसटी कपातीनंतर या हॅचबॅकची किंमत कमी झाली आहे. विशेष म्हणजे, ही कार फक्त ₹५०,००० च्या डाउन पेमेंटवर खरेदी करणे शक्य आहे. तुमच्या कारचा फायनान्स प्लॅन निश्चित करण्यासाठी आधी ऑन-रोड किंमत जाणून घेणे महत्वाचे आहे.
2 / 6
जीएसटी सुधारणा २.० अंतर्गत, लहान कारवरील जीएसटी दर २८% वरुन १८% पर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळेच या कारची किंमत ₹७५,००० पर्यंत कमी झाली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत ₹४.५७ लाख पासून सुरू होते, जी टॉप व्हेरिएंटसाठी ₹७.८४ लाख पर्यंत जाते.
3 / 6
टाटा टियागोच्या बेस व्हेरिएंटची (XE पेट्रोल) एक्स-शोरूम किंमत ₹४.५७ लाख, तर ऑन-रोड किंमत सुमारे ₹५ लाख आहे. ₹५०,००० च्या डाउन पेमेंटसह, कर्जाची रक्कम अंदाजे ₹४.५ लाख असेल.
4 / 6
उदाहरणार्थ, तुम्ही ८.५% व्याजदराने ५ वर्षांसाठी कर्ज घेतले तर बँक आणि क्रेडिट स्कोअरनुसार दरमहा ईएमआय सुमारे ₹९,२०० ते ₹११,५०० असेल. दरम्यान, टाटा टियागोची ऑन-रोड किंमत प्रकार आणि शहरानुसार बदलू शकते.
5 / 6
टाटा टियागो पेट्रोल व्हेरिएंटमध्ये ३५ लिटर इंधन टाकी आहे. प्रति लिटर १९ किलोमीटरच्या मायलेजवर, ही कार पूर्ण टाकी भरल्यावर अंदाजे ६६५ किलोमीटरची रेंज देते. तर, सीएनजी व्हेरिएंटमध्ये ६०-लिटर सीएनजी टाकी आहे, जी २४ किमी/किलो मायलेज देते.
6 / 6
अशाप्रकारचे, पेट्रोल आणि सीएनजीवर ही कार १,००० किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम आहे. त्यामुळेच ही कार लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अतिशय सोयीस्कर आहे. टियागो आपल्या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट, ह्युंदाई ग्रँड आय१० निओस, मारुती सुझुकी सेलेरियो आणि मारुती सुझुकी वॅगन आर सारख्या हॅचबॅकशी स्पर्धा करते.
टॅग्स :TataटाटाcarकारAutomobile Industryवाहन उद्योग