Tata Nexon EV Ownership Cost: टाटा नेक्सॉन ईव्ही १७ नाही, फक्त ५ लाखांना पडेल; कसे ते गणित बघा?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 05:27 PM2022-11-23T17:27:17+5:302022-11-23T17:44:53+5:30

टाटा नेक्सॉनची मालकी तुम्हाला पाच लाखांना पडेल, गणित पहा...

टाटाने देशभरात आतापर्यंत ५० हजारहून अधिक TaTa Nexon EV विकल्या आहेत.

नेक्सॉन ईव्हीची ऑनरोड किंमत १६ ते १७ लाख रुपये आहे.

तुम्ही केवळ ४.९ लाख रुपयांतच नेक्सॉन ईव्ही खरेदी करू शकता.

इलेक्ट्रीक कारवर केंद्र सरकार २.९९ लाखांची सूट देते.

महाराष्ट्र सरकार यावर आणखी लाख-दीड लाख रुपयांची सूट देते.

जर तुम्ही कर्ज काढले तर त्याच्या व्याजावर देखील दीड लाख रुपयांची सूट आहे.

इलेक्ट्रीक कार घेतली तर तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये देखील सूट आहे. अन्य पेट्रोल, डिझेल कारवर सूट नाही बरं का...

नेक्सॉनच्या कॅल्क्युलेटरप्रमाणे तुमचे दिवसाचे रनिंग ७० किमी असेल तर... तुम्हीच विचार करा तुमच्या रनिंग कॉस्टचा. महिन्याला किती पेट्रोल, डिझेल लागते ते.

पेट्रोलची किंमत १०० रुपये जरी पकडली तरी तुम्ही पाच वर्षांत साडे सहा लाख रुपये वाचवाल.

ही सारी सूट आणि इंधनावरील रक्कम कारच्या किंमतीतून वजा केली तर नेक्सॉन ५ लाखांनाच पडेल.

अशाचप्रकारे टाटा टिगॉर, टियागो ईव्ही तुम्हाला याहूनही स्वस्त पडेल. फक्त तेवढे रनिंग असायला हवे.