शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA Moters: टाटा मोटर्सची दिवाळी ऑफर! लाखाला 799 EMI भरा, कार घेऊन जा

By हेमंत बावकर | Published: November 11, 2020 1:35 PM

1 / 10
कोरोनामुळे ऑटो विक्री सुधारण्यासाठी कंपन्या मोठमोठ्या ऑफर ग्राहकांना देऊ करत आहेत. अशातच देशला पहिल्या ५ स्टार कार देणाऱ्या टाटा मोटर्सने एचडीएफसी बँकेसोबत करार केला आहे. यानुसार ग्राहकांना कमीतकमी ईएमआयमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर कार घरी घेऊन जाता येणार आहे.
2 / 10
यानुसार लाखाला केवळ 799 रुपयांचा ईएमआय देऊन कार घरी नेता येणार आहे. यासाठी टाटा मोटर्स आणि एचडीएफसी बँकेने दोन योजना लाँच केल्या आहेत. ग्रॅज्युअल स्टेप अप स्कीम (Gradual Step Up Scheme) आणि टीएमएम फ्लेक्सी ड्राईव्ह (TML Flexi Drive) अशी या योजनांची नावे आहेत.
3 / 10
या ऑफरनुसार ग्राहक लाखाला कमीतकमी ईएमआय 799 रुपये देऊन कार विकत घेऊ शकणार आहेत. यामध्ये कार आणि त्याचे व्हेरिअंटवर हा ईएमआय़ अवलंबून आहे.
4 / 10
या योजनेत पुढील दोन वर्षांत हळूहळू ईएमआय वाढत जाणार आहे. मात्र, ही वाढ ग्राहकाच्या पसंतीनुसारच होणार आहे.
5 / 10
ही योजना ग्राहकांना वेगाने कार खरेदी आणि कारचा ईएमआय पॉकेट फ्रेंडली करण्यासाठी आणण्यात आल्याचे कंपनीने सांगितले.
6 / 10
या योजनेनुसार ग्राहक प्रत्येक वर्षाला कोणतेही तीन महिने निवडू शकणार आहेत. या तीन महिन्यांत ग्राहक लाखाला 789 रुपये एवढा कमी ईएमआय देणार आहेत.
7 / 10
या योजनेचा फायदा नोकरदारांपेक्षा व्यवसायिकांना अधिक होणार आहे. कारण त्यांचा इन्कम हा सिझननुसार असतो. यामुळे हे ग्राहक उत्पन्न कमी असलेल्या महिन्यात कमी ईएमआय निवडू शकतात.
8 / 10
याचबरोबर टाटा मोटर्सच्या कारवर एचडीएफसी एक्स शोरुम 100 टक्के कर्ज देणार आहे. हे कर्ज वरील दोन्ही स्कीमवर उपलब्ध आहे.
9 / 10
टाटा मोटर्सच्या ताफ्यात दोन फाईव्ह स्टार सेफ्टी असलेली वाहने आहेत. यामध्ये टाटा नेक्सॉन आणि आताच नवीन लाँच झालेली हॅचबॅक अल्ट्रूझ ही आहे.
10 / 10
य़ाशिवाय टियागो, कॉम्पॅक्ट सेदानमध्ये टिगॉर, हेक्सा आणि धाकड एसयुव्ही हॅरिअर देखील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.
टॅग्स :TataटाटाDiwaliदिवाळीcarकारhdfc bankएचडीएफसी