शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TVS Jupiter ला धोबीपछाड! ‘ही’ स्कूटर पोहोचली दुसऱ्या क्रमांकावर; सर्वाधिक विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 2:01 PM

1 / 10
देशात टू-व्हीलरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, मोपेड सेगमेंटमध्ये मोठी चढाओढ असल्याचे पाहायला मिळत आहे. या विक्रीच्या स्पर्धेत होंडा अॅक्टिव्हाचे प्रथम स्थान कायम असून, TVS Jupiter ची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
2 / 10
दीर्घ कालावधीनंतर देशातील सर्वात जास्त विक्री होणारी दुसऱ्या क्रमांकाची स्कूटर TVS Jupiter ला जबरदस्त टक्कर मिळाली आहे. जपानी वाहन निर्माता सुझुकीची प्रसिद्ध स्कूटर Suzuki Access ने यावेळी Jupiter वर विक्रीच्या बाबतीत मात केली आहे.
3 / 10
गेल्या ऑगस्ट महिन्यात नेहमीप्रमाणे Honda Activa देशातील सर्वात जास्त विक्री होणारी स्कूटर ठरली. कंपनीने एकूण २,०४,६५९ एक्टिवा बाजारात विकल्या, या तुलनेत गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीने १,९३,६०७ एक्टिवा विकल्या होत्या.
4 / 10
म्हणजेच ५.७ टक्क्यांनी एक्टिवाच्या विक्रीत वाढ झाली. तर, सुझुकीने एकूण ४९,१३५ Access स्कूटर भारतात विकल्या आणि देशातील दुसरी सर्वात जास्त विक्री होणारी स्कूटर ठरली.
5 / 10
Suzuki Access च्या विक्रीतही या ऑगस्ट महिन्यात वाढ झाली, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीने फक्त ४१,४८४ Access स्कूटरची विक्री केली होती. Suzuki Access च्या विक्रीतही या ऑगस्ट महिन्यात वाढ झाली.
6 / 10
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीने फक्त ४१,४८४ Access स्कूटरची विक्री केली होती. परिणामी आतापर्यंत दुसऱ्या क्रमांकावर असलेली TVS Jupiter तिसऱ्या स्थानावर गेली आहे. ऑगस्टमध्ये कंपनीने फक्त ४५,६२५ Jupiter स्कूटर विकल्या.
7 / 10
TVS Jupiter च्या विक्रीमध्ये १२.८ टक्क्यांची मोठी घट नोंदवण्यात आली. या स्कूटरची विक्री सतत कमी होत आहे, दीर्घ काळापासून या स्कूटरला कंपनीकडून कोणतेही अपडेट मिळालेले नाही हे देखील त्यामागील एक कारण आहे.
8 / 10
नवीन Suzuki Access ही स्कूटर एकूण ७ व्हेरिअंट्समध्ये बाजारात येते. यामध्ये कंपनीने १२४ सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडरयुक्त फ्यूल इंजेक्टेड इंजिन दिले आहे.
9 / 10
यात ब्लूटूथ-एनेबल्ड स्मार्टफोन-कनेक्टिविटी इंस्ट्रूमेंट क्लस्टर तुम्हाला टर्न-बाय-टर्न नेविगेशन, कॉल, SMS, व्हॉट्सअॅप अलर्ट, ओवरस्पीडिंग अलर्ट, ट्रिप शेअरिंग आणि अखेरीस पार्किंग केलेली जागेची माहिती अशा सुविधा मिळतात.
10 / 10
तसेच या स्कूटरमध्ये LED हेडलाइटसोबत क्रोम बेजल, सेमी-डिजिटल इन्फॉर्मेशन पॅनलसह इको-असिस्ट इंडिकेटर दिले आहे. सुझुकीने अलीकडेच सुझुकी राइड कनेक्ट फीचरसह नवीन व्हेरिअंट आणले आहे.
टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग