शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' SUV नं येताच केला धमाका; कंपनीच्या विक्री २३४ टक्क्यांची वाढ, पाहा काय आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 11:22 AM

1 / 10
स्कोडा (Skoda) या कंपनीनं जून महिन्यात नवी एसयूव्ही Skoda Kushaq आणि Skoda Octavia सेडान लाँच केली होती. लाँचपासूनच या नव्या एसयूव्हीला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
2 / 10
लाँच नंतरच एका महिन्याच्या आतच या एसयूव्हीमुळे कंपनीच्या विक्रीत 234 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. कंपनीनं एका प्रेस रिलिजद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
3 / 10
दरम्यान, जुलै 2021 या महिन्यात स्कोडा इंडियाच्या 3,080 गाड्यांची विक्री झाली होती. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत ही विक्री 234 टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात कंपनीच्या 922 गाड्यांची विक्री झाली होती.
4 / 10
तर दुसरीकडे गेल्या महिन्याच्या विक्रीची तुलना केल्यास कंपनीच्या विक्रीत 320 टक्क्यांची वाढ झाली आहे. जून 2021 मध्ये कंपनीनं 734 गाड्यांची विक्री केली होती.
5 / 10
कंपनीच्या म्हणण्यानुसार स्कोडा कुशाकच्या लाँचमुळे कंपनीच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लाँचच्या एका महिन्याच्या आतच कंपनीला कुशाकची २ हजार बुकिंग मिळाल्या होत्या. तर आतापर्यंत ६ हजार कार्सची बुकिंग करण्यात आली आहे.
6 / 10
Skoda Kushaq ची सुरूवातीची किंमत 10.50 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. ही कार दोन पेट्रोल इंजिन ऑप्शनमध्ये येते. कारमध्ये 1.0 लीटर 3 सिलिंडर TSI पेट्रोल आणि 1.5 लीटर 4 सिलिंडर TSI पेट्रोल इंजिनचा ऑप्शन देण्यात आला आहे.
7 / 10
1.0 लीटर इंजिन 113bhp ची पॉवर आमि 175Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तर दुसरीकडे 1.5 लीटर इंजिन 148bhp ची पॉवर आणि 250Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.
8 / 10
फीचर्सबाबत सांगायचं झालं तर नव्या स्कोडा कुशाकमध्ये 10 इंचाचा इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आला आहे. तसंच ते Apple CarPlay आणि Android Auto सपोर्टसोबत येतं.
9 / 10
याशिवाय या एसयूव्हीमध्ये वायरलेस मिररलिंक, व्हेंटिलेटेड फ्रन्ट सीट्स, रिअर एसी वेंट्स, अॅम्बिअंट लायटिंग, 7 स्पिकर म्युझिक सिस्टम देण्यात आलं आहे.
10 / 10
स्कोडा कुशाक या एसयूव्हीची टक्कर क्रेटा, किआ सेल्टोस, टाटा हॅरिअर, रेनो डस्टर आणि निसान किक्ससारख्या कार्सशी आहे.
टॅग्स :Skodaस्कोडाcarकारIndiaभारतHyundaiह्युंदाईNissanनिस्सानKia Motars Carsकिया मोटर्सAutomobileवाहन