धक्कादायक...! मारुतीने अर्टिगाचे डिझेल मॉडेल केले बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 03:54 PM2019-08-15T15:54:01+5:302019-08-15T16:00:00+5:30

मारुती सुझुकीने नुकतीच नवीन लांबलचक अर्टिगा लाँच केली होती. या कारला ग्राहकांचा मोठा प्रतिसादही मिळत होता. मात्र, कंपनीने अर्टिगाचे डिझेल इंजिन प्रकाराचे मॉडेल बंद केले आहे.

मारुतीने पेट्रोल, सीएनजी प्रकारासोबत डिझेलच्या दोन इंजिनांचे पर्याय लाँच केले होते. यामध्ये 1.3 लीटर आणि 1.5 लीटर इंजिन होते. भविष्यात सुरू होणाऱ्या बीएस-6 मानकांमुळे मारुतीवर बंधने आली आहेत. यामुळे ओम्नी, जिप्सीसारख्या गाड्या मारुतीला बंद कराव्या लागल्या आहेत. जिप्सी कार नव्या रुपात येण्याची शक्यता आहे.

नवीन मानकांनानुसार मारुतीच्या अर्टिगाचे 1.3 लीटर इंजिन नियमावली पार करत नव्हते. मारुती पुढील वर्षा पर्यंत डिझेलच्या कार बंद करणार आहे. याचीच सुरूवात कंपनीने केली आहे. मारुतीने 1.3 लीटरचे इंजिन असलेले मॉडेल कोणलाही कळू न देता बंद केले आहे.

मारुतीकडे याआधी फियाटचे 1.2 लीटर इंजिन होते. मात्र, फियाटला पैसा जास्त जात असल्याने मारुतीने स्वताचे इंजिन बनविले. यामध्ये 1.3 आणि 1.5 लीटर असे इंजिन होते. मात्र, बीएस-6 मुळे इंजिनांची किंमत वाढत असल्याने गाड्यांच्या किंमतीही 2 ते 3 लाखाने वाढणार होत्या.

यामुळे पेट्रोल आणि डिझेल कारमधील अंतर 2.5 लाखांनी वाढले असल्याने ग्राहकांनी पेट्रोलच्या वाहनांकडे लक्ष दिले होते. यामुळे मारुतीसारख्या मोठ्या खपाच्या कंपनीला स्विफ्ट, बलेनोसारख्या छोट्या गाड्यांमधून डिझेल इंजिन बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता.

याचा परिणाम मारुती त्यांची केवळ डिझेलमध्ये मिळणारी ब्रिझाही पेट्रोलमध्ये आणणार आहे. तर नवीन एमपीव्ही XL6 ही कार देखील 21 ऑगस्टला लाँच होणार आहे.

ही कार हायब्रिड असणार असून K15 BSVI इंजिन असेल. या कारची विक्री नेक्सा शोरूममधून होणार आहे.