शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Royal Enfieldचा जबरदस्त प्लॅन, धमाकेदार फीचर्ससह मार्केटमध्ये येणार ‘शॉटगन’, अशी आहेत वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 10:06 PM

1 / 7
रॉयल एनफील्ड सध्या अनेक नव्या बाईक्सवर काम करत आहे. मात्र कंपनी विशेषकरून आरई ६५० सीसीच्या टेस्टिंगवर काम करत आहे. रॉयल एनफील्ड ऑगस्ट महिन्यामध्ये एक नवीन बाईक लॉन्च करण्यावर प्लॅन करत आहे. या महिन्यात हंटर ३५० ला कंपनी मार्केटमध्ये आणणार आहे.
2 / 7
या वर्षाच्या अखेरीस रॉयल एनफील्ड एक क्रूझर बाईक बाजारात आणू शकते. अपेक्षा आहे की ही बाईक ६५०सीसी इंजिन कॅपॅसिटी सोबत येईल. या बाईकला शॉटगन ६५० असं म्हटलं जात आहे. शॉटगन ६५० ला टेस्टिंगदरम्यान चेन्नईमध्ये पाहण्यात आले. ही बाईक रॉयल एनफील्ड एसजी६५० वर आधारित आहे.
3 / 7
कंपनी शॉटगन ६५० ला ६५० ट्विंस प्लॅटफॉर्मवर तयार करत आहे. त्याशिवाय अजूनही काही बाईक लवकरच मार्केटमध्ये लॉन्च करण्याचा प्लॅन करत आहे. कंपनी सुपर मीटिओर ६५० ही सुद्धा येणार आहे. ती एक ६५० सीसी ची क्रूझर बाईक आहे.
4 / 7
जर शॉटगन ६५०च्या फिचर्सचा विचार केला तर याच्या फ्रंटमध्ये कंपनीने यूएसडी फोर्क्स देण्यात आले आहे. तसेच बाईकच्या रियरमध्ये डुअल शॉक अबजॉर्बर्स देण्यात आले आहेत. ही बाईक अलॉय व्हील्ससोबत येईल. तसेच या बाईकचे टायर्स हे ट्युबलेस असतील.
5 / 7
शॉटगन ६५० मध्ये कंपनी ट्विन-पॉड इंस्ट्रूमेंट कंसोल देऊ शकते. ही ट्रिपर नेव्हिगेशनसोबत येऊ शकते. रॉयल एनफील्ड शॉटगन ६५० राऊंड शेप हेडलँम्प स्प्लिट सीट आणि मोठ्या फ्युएल टँकसह येऊ शकते. हे ट्रिपर नेव्हिगेशनसोबत येऊ शकते. याशिवाय कंपनी यामध्ये अजून काही नवे फीचर्ससुद्धा अॅड करू शकते.
6 / 7
रॉयल एनफील्ड शॉटगन ६५० भारतीय बाईक मार्केटमध्ये हार्ले डेव्हिसन आणि इंडियन मोटरसायकल्ससारख्या महागड्या बाईक्सना टक्कर देऊ शकते. मात्र कंपनीने आतापर्यंत याचे फीचर्स आणि किमतींबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
7 / 7
रॉयल एनफिल्ड शॉटगनमध्ये ६५० सीसीचं नवं इंजिन असू शकतं. ही बाईक ६ स्पीड गिअरबॉक्ससह येऊ शकते. ही बाईक डुअल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम आणि ट्रिपर नेव्हिगेशनसारख्या फीचरसह येऊ शकते.
टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डtwo wheelerटू व्हीलरbusinessव्यवसाय