केवळ १८६ रुपयांचा दिवसाला हप्ता; दोन मिनिटांत पहा Maruti Suzuki Alto चे गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 12:23 PM2020-11-28T12:23:57+5:302020-11-28T12:28:10+5:30

Maruti Suzuki Alto मारुतीच्या अल्टोची एक्स शोरुम किंमत ३ लाख रुपयांपासून सुरु होते. तरीही तुमचे बजेट कमी असेल तर ही बातमी तुमच्या कामी येऊ शकते अन् तुमचे कारचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

Maruti Suzuki Alto (मारुती सुजुकी अल्टो) देशातील सर्वात मोठ्या खपाची कार आहे. या कारने २० वर्ष पूर्ण केली आहेत. या काळात अनेकदा बेस्ट सेलिंग कारचा पुरस्कार मिळाला आहे.

मारुतीच्या अल्टोची एक्स शोरुम किंमत ३ लाख रुपयांपासून सुरु होते. तरीही तुमचे बजेट कमी असेल तर ही बातमी तुमच्या कामी येऊ शकते अन् तुमचे कारचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

मारुतीची अल्टो कार दिवसाला केवळ १८५.५ रुपयांचा हप्ता देऊन खरेदी केली जाऊ शकते. जाणून घ्या याचा हिशेब.

Maruti Suzuki Alto चे बेस व्हेरिअंट दिल्लीमध्ये 2,94,800 रुपये आहे. दिल्ली ऑनरोड किंमत 3,24,460 रुपये आहे. यात आरटीओ, इन्शुरन्सची रक्कम आहे.

जर ५०००० रुपये डाऊनपेमेंट केले तर 274460 रुपये लोन घ्यावे लागेल. एसबीआयकडून लोन घेतले तर ८ टक्के व्याजदर आहे.

५ वर्षांच्या कालावधीसाठी लोन घेतले तर महिन्याला 5,565 ईएमआय बसतो. अशाप्रकारे महिन्याच्या दिवसांचा हिशेब घातल्यास दिवसाला 185.5 रुपयांचा हप्ता बसणार आहे.

मारुती सुझुकी अल्टो ही छोटी असली तरीही स्टायलिश लुक आणि चांगले इंजिन म्हणून पसंत केली जाते. शिवाय २२.०५ किमी प्रति लीटरचे मायलेजही दिले जाते.

महत्वाचे म्हणजे शहरात ही छोटी कार फार उपयुक्त आहे. सीएनजी व्हेरिअंट 31.59 किलोमीटर प्रति किलोग्रामचे मायलेज देते.

अल्टोमध्ये 796 सीसी, 3-सिलिंडर, 12-व्हॉल्व, BS-6 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ६००० आरपीएमवर 48PS ची अधिकतर ताकद प्रदान करते. तर 3500 आरपीएम वर 69Nm चा पीक टॉर्क देते. याचे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचे आहे.

अल्टोमध्ये पुढे डिस्क ब्रेक आहे. तर मागे ड्रम ब्रेक दिला आहे. पुढे MacPherson Strut सस्पेन्शन दिले आहे, तर मागे 3-लिंक रिजिड एक्सेल सस्पेंशन देण्यात आले आहे.