शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Uber चे एक पाऊल पुढे, मुंबईसह या शहरांमध्ये देणार इलेक्ट्रिक कॅब सर्व्हिस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 3:06 PM

1 / 7
कॅब सेवा देणारी कंपनी Uber ने सस्टेनेबल मोबिलिटीच्या दिशेने भारताच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, कंपनी आता इलेक्ट्रिक वाहने चालवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.
2 / 7
EV फायनान्सिंग आणि EV चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चरसाठी उबरने अनेक मोठ्या कंपन्यांशी हातमिळवणीदेखील केली आहे. उबरने देशातील तीन प्रमुख शहरांमध्ये आपली उबर ग्रीन सेवा सुरू केली आहे.
3 / 7
काय आहे उबर ग्रीन? जूनपासून Uber Green च्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या राइड्ससाठी इलेक्ट्रिक वाहने बुक करता येतील. याचाच अर्थ उबर आता भारतात इलेक्ट्रिक वाहने चालवेल.
4 / 7
Uber ची इलेक्ट्रिक कॅब सेवा जून 2023 पासून सुरू होत आहे. मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये कंपनी आपली Uber ग्रीन सेवा सुरू करणार आहे.
5 / 7
उबर इंडियाचे व्हॉइस प्रेसीडेंट Andrew Mcdonald ने सांगितले की, आगामी काळात कंपनीने भारतातील 125 शहरांमध्ये ग्रीन कारचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
6 / 7
कंपनीने ईव्ही फ्लीट पार्टनर लिथियम अर्बन टेक्नॉलॉजी, एव्हरेस्ट फ्लीट प्रायव्हेट लिमिटेड आणि मूव्ह सारख्या कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. येत्या दोन वर्षांत 25 हजार इलेक्ट्रिक वाहने आपल्या प्लॅटफॉर्मशी जोडण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
7 / 7
एवढंच नाही, तर यासाठी उबरने Zypp इलेक्ट्रिकशी हातमिळवणी केली असून 2024 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक दुचाकीही लॉन्च करण्यात येणार आहेत. म्हणजेच येत्या काळात आपल्याला इलेक्ट्रिक कॅब पाहायला मिळणार आहे.
टॅग्स :UberउबरElectric Carइलेक्ट्रिक कारbusinessव्यवसाय