आता CNG सह धमाका करण्यासाठी येतायत 4 SUV; मायलेज मिळेल जबरदस्त, किंमतही असेल कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 13:43 IST
1 / 6भारतातील कार निर्माता कंपन्या आता सीएनजी बेस्ड कारवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. यात पहिल्या क्रमांकावर आहे मारुती सुझुकी. या सेग्मेंटमध्ये टाटा मोटर्सनेही एंट्री केली आहे. आता किआ सारख्या कंपन्याही याची सुरुवात करत आहेत. 2 / 6बाजारात चार एसयूव्ही कार लवकरच सीएनजीसह येणार आहेत. यात दोन कार मारुती सुझुकी तर प्रत्येकी एक कार टाटा मोटर्स (Tata Motors) आणि किआ (Kia Motors)ची आहे. 3 / 6Maruti Suzuki Brezza CNG: गेल्या ऑटो एक्सपोमध्ये मारुती सुझुकीने ब्रेझा सीएनजीचा खुलासा केला होता. येणाऱ्या काही महिन्यांतच हिचे लाँचिंग केले जाईल. यात 1.5 लिटर पेट्रोल इंजिनसह CNG किटचा पर्याय मिळेल. विशेष म्हणजे, या CNG मॉडेलमध्ये मॅन्युअलसह ऑटोमॅटिक ट्रान्समिशनही मिळू शकते. अशा पर्यायांचा दावा करणारी ही पहिलीच कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे.4 / 6Maruti Suzuki Fronx CNG: कंपनीने आपली फ्रोंक्स एसयूव्ही देखील या ऑटो एक्सपोमध्ये सादर केली होती. पेट्रोल इंजिन असलेल्या फ्रोंक्सची बुकिंगदेखी लसुरू आहे. ही कार पुढच्या महिन्यात लॉन्च केली जाणार आहे. ही कार सुरुवातीलाच सीएनजी व्हेरिअँटमध्ये सादर केली जाऊ शकते, असा अंदाज आहे. यात 1.2L चार-सिलिंडर पेट्रोल इंजिनसह सीएनजी पर्यायही असेल. 5 / 6Tata Punch CNG: टाटा मोटर्सनेही ऑटो एक्सपोमध्ये आपली पंच सीएनजी सादर केली होती. या कारमध्ये 1.2L तीन-सिलिंडर पेट्रोल इंजिनसह सीएनजीचाही पर्याय आहे. यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह जोडले जाईल. या वर्षाच्या अखेर पर्यंत हिचे लॉन्चिंग होईल. विशेष म्हणजे, कंपनीने या कारचा 60 लिटर सीएनजी टँक दोन भागात विभागला आहे. यामुळे बूट स्पेस पेट्रोल मॉडेल प्रमाणेच राहील.6 / 6Kia Sonet CNG: किआ सॉनेटचे सीएनजी मॉडेल नुकतेच टेस्टिंगदरम्यान दिसून आले होते. यामुळे, सीएनजी व्हर्जनची तयारी केली जात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ही कार येणाऱ्या काही महिन्यांत BSVI स्टेज 2 च्या अनुपालनासह लॉन्च केले जाईल. पेट्रोल-वेरिअंटच्या तुलनेत, सीएनजी मॉडलची किंमत जवळपास 1 लाख रुपयांनी वाढू शकते.