सुझकीची ९९९सीसी मोटरसायकल दोन लाखाने स्वस्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 21:36 IST2018-03-23T21:36:57+5:302018-03-23T21:36:57+5:30

सुझुकी मोटारसायकल्सने आपल्या GSX-R1000R या दुचाकीच्या किंमतीत मोठी घट झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनीने या बाईकची किंमत साधारण 2.20 लाखांनी कमी केली आहे.
अनेक बाईकप्रेमींना आता ही बाईक विकत घेण्याचे आपले स्वप्न पूर्ण करता येणे शक्य आहे.
GSX-R1000R या बाईकची एक्स-शोरूम किंमत 22.50 लाख इतकी होती. दर कमी केल्यानंतर ही किंमत 20.3 लाखांपर्यंत येऊन पोहोचली आहे.