शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 14:24 IST

1 / 6
देशातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी Hero MotoCorp ने भारतात त्यांच्या लोकप्रिय Hero Xtreme 125R चे नवीन सिंगल सीट व्हेरिएंट लॉन्च केले आहे. दिल्लीमध्ये या बाईकची एक्स-शोरूम किंमत फक्त १ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. हे व्हेरिएंट कंपनीच्या टॉप एंड स्प्लिट सीट ABS मॉडेलपेक्षा 2000 रुपये स्वस्त आहे.
2 / 6
Hero Xtreme 125R सिंगल सीट व्हेरिएंटची किंमत 1 लाख रुपये आहे, तर स्प्लिट सीट IBS व्हेरिएंटची किंमत 98,425 रुपये आहे. याशिवाय, स्प्लिट सीट ABS व्हेरिएंटची किंमत 1 लाख 2 हजार रुपये आहे. या सर्व किमती दिल्ली एक्स-शोरूम आहेत.
3 / 6
Hero च्या या बाईकच्या व्हेरिएंटमध्ये फक्त सीटची डिझाइन बदलण्यात आली आहे. उर्वरित इंजिन आणि इतर फिचर्स सारखेच आहेत. बाईकचे सिंगल सीट डिझाइन रायडर आणि पिलियन दोघांनाही चांगला आराम देईल.
4 / 6
Hero Xtreme 125R मध्ये 124.7 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे नवीन हिरो ग्लॅमर एक्स 125 मध्ये देखील मिळते. हे इंजिन 8,250 आरपीएम वर 11.4 बीएचपी पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. तर, 6,000 आरपीएम वर 10.5 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात 5 स्पीड गिअरबॉक्स मिळतो.
5 / 6
या बाईकचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे क्रूझ कंट्रोल, जे आतापर्यंत फक्त KTM 390 Duke आणि TVS Apache RTR 310 सारख्या प्रीमियम बाइक्समध्येच मिळत होते. यासोबतच, बाइकमध्ये राइड-बाय-वायर थ्रॉटल आणि तीन रायडिंग मोड (इको, रोड, पॉवर) मिळतात.
6 / 6
फिचर्सची यादी इथेच संपत नाही. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह अ‍ॅडॉप्टिव्ह एलसीडी डिस्प्ले, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि फुल-एलईडी लाइटिंग सारख्या प्रगत फिचर्सचादेखील त्यात समावेश आहे.
टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पbikeबाईकAutomobile Industryवाहन उद्योग