1 / 8भारतीय इलेक्ट्रीक वाहनांच्या बाजारात एका नव्या कंपनीने उडी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मॅटर या दुचाकी कंपनीने गिअरवाली इलेक्ट्रीक मोटरसायकल लाँच केली आहे.2 / 8सध्या बाजारात प्रामुख्याने तीन कंपन्यांच्या ईव्ही मोटरसायकल आहेत. परंतू या सर्व बिनागिअरच्या आहेत. पेट्रोलच्या ज्या मोटरसायकल आहेत त्या देखील गिअरच्याच असतात. यामुळे या लोकांना ईव्हीवर वळताना गिअर टाकण्याची सवय असल्याने त्रास होतो. ओलाने रोडस्टरमध्ये क्लचची जागाच रिक्त ठेवली होती. परंतू, मॅटरने मोटरसायकल स्वारांची ही नस ओळखली आहे. 3 / 8मॅटरने Matter Aera नावाची मोटरसायकल भारतीय बाजारात लाँच केली आहे. या बाईकमध्ये सात इंच स्मार्ट टचस्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये नेव्हिगेशन, राईड डेटा, म्युझिक कंट्रोलसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये ओटीए अपडेटही दिला जाणार आहे. 4 / 8या बाईकमध्ये स्पोर्टी लुक असून इतर पेट्रोल बाईकप्रमाणेच ड्युअल डिस्क ब्रेक, एबीएस, ड्युअल सस्पेंशन सिस्टीम, स्मार्ट पार्क असिस्टसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. 5 / 8याचबरोबर की-लेस, रिमोट लॉक-अनलॉक, लाईव्ह लोकेशन, जिओ फेन्सिंग सारखी फिचर्स देण्यात आली आहेत. जी इतर इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये देखील आहेत. 6 / 8बाईकमध्ये आयपी ६७ रेटेड बॅटरी देण्यात आली असून ती १७२ किमी पर्यंतची रेंज देते. ०-४० किमीचा वेग गाठण्यासाठी फक्त २.८ सेकंद लागतात.7 / 8या बाईकचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिची गिअरवाली मोटर. फोर-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. ज्याद्वारे मोटर ट्यून केली गेली आहे. 8 / 8प्रति किलोमीटर फक्त २५ पैसे एवढा ही मोटरसायकल चालविण्याचा खर्च असल्याचा दावा मॅटरने केला आहे.