शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

मारुती ८०० चा 'इलेक्ट्रिक' अवतार! फोटो पाहून म्हणाल, "स्वप्न तेव्हाचे..."; कंपनी आताही प्रत्यक्षात उतरवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 11:01 IST

1 / 10
भारतीय रस्त्यांवरील 'किंग' मानली जाणारी आणि मध्यमवर्गीयांचे कारचे स्वप्न पूर्ण करणारी 'मारुती ८००' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी ती पेट्रोल इंजिनमुळे नाही, तर तिच्या जबरदस्त 'इलेक्ट्रिक' लूकमुळे इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
2 / 10
सोशल मीडियावर मारुती ८०० च्या इलेक्ट्रिक अवताराचे फोटो तुफान व्हायरल होत असून, नेटकरी या मॉडर्न डिझाइनच्या प्रेमात पडले आहेत.
3 / 10
मारुती सुझुकीने अधिकृतपणे मारुती ८०० इलेक्ट्रिक लाँच करण्याची घोषणा केलेली नाही. हे फोटो 'Rishav Kumar' (@rishavkumar_) नावाच्या एका डिजिटल आर्टिस्टने तयार केले आहेत.
4 / 10
त्याने जुन्या मारुती ८०० ला एक 'फ्यूचरिस्टिक' आणि 'नियो-रेट्रो' लूक दिला आहे. मारुती सुझुकीने नुकतीच त्यांची पहिली ई-कार 'eVitara' लाँच केल्याच्या पार्श्वभूमीवर, या डिजिटल रेंडरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
5 / 10
एक्सटेरियर: जुना बॉक्सी आकार कायम ठेवून याला आधुनिक स्पर्श देण्यात आला आहे. समोरच्या बाजूला क्लोज्ड ग्रिल, स्लीक LED लाईट बार आणि स्क्वेअर हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत.
6 / 10
सायबरपंक टच: कारला 'फ्लश डोअर हँडल्स' आणि 'एअरो डिस्क व्हील्स' देण्यात आले आहेत, ज्यामुळे ती एखाद्या हाय-टेक कारसारखी दिसते.
7 / 10
इंटिरिअर: गाडीचे केबिन अत्यंत 'मिनिमलिस्ट' म्हणजेच साधे पण आधुनिक आहे. यात ड्रायव्हरच्या सोयीसाठी डिजिटल डिस्प्ले आणि स्टायलिश डॅशबोर्ड दाखविला आहे.
8 / 10
१९८३ मध्ये अवघ्या ४७,५०० रुपयांत लाँच झालेली ही कार २०१० पर्यंत भारतीयांच्या मनावर राज्य करत होती. ७९६ सीसी इंजिन असलेली ही कार लो-मेंटेनन्ससाठी ओळखली जात असे.
9 / 10
आता तंत्रज्ञान बदलले असून ऑटो इंडस्ट्री इलेक्ट्रिककडे वळत आहे, अशात जुन्या आठवणींना या डिजिटल आर्टिस्टने दिलेला हा उजाळा सर्वांना भावत आहे.
10 / 10
जरी कंपनीचा सध्या ही कार बनवण्याचा विचार नसला, तरी सोशल मीडियावरील प्रतिसाद पाहता, जर मारुतीने अशा प्रकारची परवडणारी इलेक्ट्रिक कार आणली, तर ती पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत क्रांती घडवू शकते.
टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकी