Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 13:44 IST
1 / 5Mahindra BE 6 Batman Edition: भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी Mahindra ने अलीकडेच त्यांच्या लोकप्रिय BE 6 इलेक्ट्रिक SUV चे Batman Edition लॉन्च केले आहे. हे एडिशन प्रसिद्ध 'द डार्क नाइट' चित्रपटातील बॅटमोबिलवरुन प्रेरित आहे. 2 / 5ही एसयूव्ही लोकांना इतकी आवडली की, फक्त 135 सेकंदात सर्व कार विकल्या गेल्या. सुरुवातीला कंपनीने फक्त 300 युनिट्स लॉन्च केले होते, परंतु प्रचंड मागणी पाहून 999 युनिट्सपर्यंत वाढवण्यात आले. पण, आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे वाढलेल्या युनिट्सदेखील काही मिनिटांतच पूर्ण बुक झाल्या.3 / 5ही एसयूव्ही तिच्या उत्तम डिझाइन, बॅटमॅन-थीम आणि लिमेटेड एडिशनमुळे खास बनली. महिंद्राचे हे मॉडेल केवळ इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एक नवीन ओळख निर्माण करत नाही, तर भारतीय बाजारात प्रीमियम आणि थीम-आधारित इलेक्ट्रिक कारची किती मागणी आहे, हेदेखील दर्शवते. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:00 वाजता विक्री सुरू झाल्यापासून 135 सेकंदांच्या सर्व युनिट्स बुक झाले.4 / 5नवीन BE 6 बॅटमॅन एडिशन एसयूव्ही सँडर्ड एडिशनसारखीच आहे. त्यात नवीन कॉस्मेटिक एलिमेंट्सदेखील आहेत. यामध्ये एक्सक्लुझिव्ह सॅटिन ब्लॅक एक्सटीरियर पेंट जॉब आहे, ज्यात समोरच्या दारावर कस्टम बॅटमॅन डेकल्स आणि मागील बाजूस “BE 6 × द डार्क नाईट” बॅजिंग आहे. अधिक शक्तिशाली लूकसाठी यात नवीन R20 अलॉय व्हील्स आहेत, तर सस्पेंशनना अल्केमी गोल्ड फिनिशिंग आहे.5 / 5इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, BE 6 बॅटमॅन व्हेरिअंट मॉडेल 79 kWh बॅटरी पॅक थ्री व्हेरिअंटवर आधारित आहे. ही SUV एका चार्जवर 682 किमी पर्यंतची रेंज देते. 59 किलोवॅट क्षमतेचा व्हेरिएंट 230 बीएचपी आणि 79 किलोवॅट क्षमतेचा व्हेरिएंट 285 बीएचपी पॉवर जनरेट करतो. दोन्हीमध्ये 380 एनएमचा टॉर्क आहे. BE 6 175 किलोवॅट पर्यंत डीसी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ही फक्त 20 मिनिटांत 20 ते 80 टक्के बॅटरी चार्ज करते.