शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Kia Sonet Facelift : नव्या अवतारात आली सोनेट, 15 सेफ्टी फीचर्ससह बरेच काही, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 2:22 PM

1 / 12
नवी दिल्ली : Kia ने आज आपल्या सब-कॉम्पॅक्ट SUV Sonet चे फेसलिफ्ट मॉडेलचे अनावरण केले आहे. Kia Sonet पहिल्यांदा सप्टेंबर 2020 मध्ये ग्राहकांसाठी भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आली होती.
2 / 12
आता कंपनीने Kia Sonet Facelift मॉडेल अपग्रेडेड फीचर्ससह नवीन डिझाइनमध्ये आणले आहे. Kia Sonet च्या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये ADAS (Advanced Driver Assistance System) देखील देण्यात आली आहे.
3 / 12
एवढेच नाही तर सुरक्षेचा विचार करता आता ग्राहकांना या कारच्या सर्व व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅगची सुविधा मिळणार आहे. फेसलिफ्ट मॉडेलमध्ये तुम्हाला नवीन डिझाइनची झलक मिळेल आणि अपग्रेड केलेले फीचर्स देखील पहायला मिळतील.
4 / 12
या कारच्या आकारमानात किंवा इंजिनमध्ये कोणताही बदल तुमच्या लक्षात येणार नाही. या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये किया सिग्नेचर टायगर-नोज ग्रिल देण्यात आली आहे, तर डीआरएलच्या प्लेसमेंटमध्ये किंचित बदल करण्यात आला आहे.
5 / 12
याचबरोबर, फेसलिफ्ट मॉडेलला नवीन हेडलाइट आणि फ्रंट बंपर देखील मिळेल. मागील बाजूस एक LED लाइट बार देण्यात आला आहे, जो दोन्ही टेललाइट्सना जोडताना दिसेल.Kia च्या या कारमध्ये 10.25 इंच मुख्य टचस्क्रीन डिस्प्ले आहे. यासोबत तुम्हाला 10.25 इंच LCD ड्रायव्हर डिस्प्ले युनिट मिळेल.
6 / 12
या कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा, स्मार्ट एअर प्युरिफिकेशन सिस्टम, इलेक्ट्रिक सनरूफ, 7 स्पीकर बोस साउंड सिस्टम आणि अॅमेझॉन अलेक्सा सपोर्ट मिळणार आहे. या कारमध्ये ग्राहकांना कंपनीकडून 15 सेफ्टी फीचर्स मिळतील. तसेच, बुकिंग बद्दल बोलायचे झाल्यास Kia Sonet च्या फेसलिफ्ट मॉडेलसाठी प्री-बुकिंग 20 डिसेंबरपासून सुरू होईल.
7 / 12
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्राहक 25 हजार रुपयांची बुकिंग रक्कम भरून या कारचे फेसलिफ्ट मॉडेल बुक करू शकतील. Kia Sonet च्या फेसलिफ्ट मॉडेलसाठी प्री-बुकिंग 20 डिसेंबरपासून सुरू होईल. जर ग्राहकांना ही कार बुक करायची असेल, तर तुम्हाला Kia च्या अधिकृत साइटवर किंवा आपल्या जवळच्या Kia डीलरशिपला भेट देऊन कार बुक करावी लागेल.
8 / 12
तसेच, Kia Sonet Facelift च्या फास्ट डिलिव्हरीसाठी Kia ग्राहक K कोड जनरेट करू शकतील. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की सोनेट ही 100 हून अधिक देशांमध्ये सर्वाधिक निर्यात होणारी कार आहे.
9 / 12
Kia Sonet चे फेसलिफ्ट मॉडेलचे सध्या अनावरण झाले आहे. हे पुढील महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. सध्या कंपनीने लाँच डेटबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
10 / 12
ही कार ग्राहकांना 8 सिंगल टोन कलर ऑप्शन, दोन ड्युअल टोन ऑप्शन आणि मॅट शेड फिनिशसह मिळेल. विशेष म्हणजे, मॅट फिनिश फक्त X लाइन व्हेरिएंटपुरते मर्यादित आहे.
11 / 12
सिंगल कलर ऑप्शनमध्ये ऑलिव्ह, ग्रे, व्हाईट, सिल्व्हर, रेड, ब्लॅक, क्लिअर व्हाईट आणि ब्लू यांचा समावेश आहे. तर ड्युअल टोनमध्ये ही कार रेड विथ ब्लॅक रुफ आणि व्हाइट विथ ब्लॅक रंगात खरेदी केली जाऊ शकते.
12 / 12
Kia Sonet च्या फेसलिफ्ट मॉडेल अधिकृत लाँच झाल्यानंतर Tata Nexon, Hyundai Verna, Maruti Suzuki Brezza आणि Mahindra XUV300 सारख्या मॉडेलला टक्कर देऊ शकते.
टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्सAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगcarकार