शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Hyundai Venue, Creta, Alcazar Launched: क्रेटाचे इंजिन! ह्युंदाईने तीन एसयुव्ही लाँच केल्या; सहा एअरबॅग, किंमतही वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 4:45 PM

1 / 10
दक्षिण कोरियन कंपनी Hyundai ने एकाचवेळी तीन एसयुव्ही लाँच केल्या आहेत. कंपनीने प्रसिद्ध मध्यम आकाराची SUV Alcazar ते Creta आणि सर्वात परवडणारे मॉडेल वेन्यू नवीन सुरक्षा वैशिष्ट्यांसह सादर केले आहे. नवीन सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे एसयूव्ही लाइनअप आणखी मजबूत होईल. नवीन अपडेट्ससोबतच या SUV च्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे.
2 / 10
Hyundai ने एकाच झटक्यात एसयुव्ही श्रेणी अद्ययावत केली आहे. या तिन्ही एसयुव्हींच्या फेसलिफ्ट लाँच केले आहे. यामध्ये इंजिन, नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये आणि काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत.
3 / 10
Hyundai Creta मध्ये, कंपनीने 6 एअरबॅग्ज, रियर डिस्क ब्रेक इत्यादींचा समावेश केला आहे, तर Alcazar मध्ये, 6-एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. ६ एअरबॅग यामुळे सर्वच कारमध्ये मिळणार आहेत. याशिवाय काही नवीन फीचर्स जसे सीट अॅडजस्टमेंट, ISOFIX अँकर इत्यादी देखील Creta मध्ये जोडण्यात आले आहेत.
4 / 10
Hyundai Venue ला पूर्वीपेक्षा जास्त पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. आकर्षक लुक शक्तिशाली इंजिन आणि नवीन सुरक्षा वैशिष्ट्यांसह या एसयुव्हीची सुरुवातीची किंमत 7.68 लाख रुपयांपासून सुरू होते. तर टॉप एंड व्हेरिअंटची किंमत 13.11 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.
5 / 10
नवीन Hyundai Venue मध्ये Creta चे इंजिन वापरले गेले आहे. यामध्ये 4 सिलेंडरचे 1.5 लिटर CRDI टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 115 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येते.
6 / 10
नवीन Hyundai Venue मागील वर्षी लाँच केलेल्या फेसलिफ्ट मॉडेलवर आधारित आहे. यामध्ये कंपनीने नवीन फ्रंट ग्रिल, स्प्लिट हेडलॅम्प, नवीन डिझाइन टेल लॅम्प इत्यादी दिले आहेत. कंपनीने Venue SUV च्या मिड-लेव्हल S साइड एअरबॅग्ज दिल्या आहेत.
7 / 10
या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), वाहन स्थिरता नियंत्रण (VSC), हिल असिस्ट कंट्रोल (HAC) आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. स्वयंचलित हेडलाइट्स, इंजिन इमोबिलायझर, बर्गलर अलार्म, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आणि रिव्हर्सिंग कॅमेरा यांचा समावेश आहे. यामध्ये चार एअरबॅग स्टँडर्ड देण्यात आल्या आहेत.
8 / 10
Hyundai Creta मध्ये कंपनीने फक्त काही नवीन फीचर्स समाविष्ट केले आहेत, या व्यतिरिक्त या SUV मध्ये इतर कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. 1.5-लीटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन (115 पीएस आणि 144 एनएम टॉर्क), 1.5-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड चार-सिलेंडर डिझेल (115 पीएस आणि 250 एनएम टॉर्क) आणि 1.4-लिटर पेट्रोलचे इंजिन असणार आहे. टर्बो पेट्रोल इंजिन (140 K पॉवर आणि 242 Nm टॉर्क) देण्यात आले आहे.
9 / 10
Creta SUV ला 6 एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), वाहन स्थिरता व्यवस्थापन (VSM), हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल (HAC), रियर डिस्क ब्रेक, सीटबेल्ट हाइट एड्जेस्टमेंट, ISOFIX चाइल्ड एंकर सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
10 / 10
Hyundai Alcazar या एसयुव्हीमध्ये नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये जोडली आहेत. या एसयूव्हीची किंमत 16.10 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी 20.85 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. ही एसयुव्ही सहा आणि सात सीट प्रकारात येते. इंधन कमी वापरण्यासाठी स्टार्ट/स्टॉप फंक्शन देण्यात आले आहे.
टॅग्स :Hyundaiह्युंदाई