Hyundai च्या अवघ्या ४ लाखांच्या मायक्रो SUVचे नाव जाहीर; जाणून घ्या, पहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 05:24 PM2021-07-18T17:24:28+5:302021-07-18T17:30:07+5:30

Hyundai Casper Micro SUV Launch in 2022: आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्टनुसार या छोट्या एसयुव्हीचे नाव ठरविले असून या नावाचा ट्रेडमार्कही रजिस्टर करण्यात आला आहे. सुरुवातीला ही कार कोरियामध्ये विकली जाणार आहे. यानंतर ती भारतासह अन्य बाजारांत उतरविली जाणार आहे.

Hyundai Casper Micro SUV Launch in 2022: दक्षिण कोरियाची सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी Hyundai ने या वर्षाच्या अखेरीस AX1 मायक्रो-एसयुव्ही बाजारात उतरविण्याची तयारी केली आहे.

आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्टनुसार या छोट्या एसयुव्हीचे नाव ठरविले असून या नावाचा ट्रेडमार्कही रजिस्टर करण्यात आला आहे. सुरुवातीला ही कार कोरियामध्ये विकली जाणार आहे. यानंतर ती भारतासह अन्य बाजारांत उतरविली जाणार आहे.

ह्युंदाईच्या या छोट्या एसयुव्हीचे नाव कॅस्पर (Hyundai Casper) असणार आहे. ही एसयुव्ही निऑस आणि व्हेन्यूच्यामध्ये उतरविली जाणार आहे. हे नाव कोरियातील असले तरी देखील भारतीय बाजारात या कारचे वेगळे असण्याची शक्यता आहे.

याची माहिती काही दिवसांत पुढे येईल. ही कार Hyundai च्या K1 कॉम्पॅक्ट कार प्लेटफॉर्मवर विकसित केली आहे. यावर Grand i10Nios आणि Santro कार बनविण्यात आल्याने भारतातही या कारसाठी फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत.

या छोट्या एसयुव्हीचे सप्टेंबर 2021 पासून उत्तर कोरियामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु केले जाणार आहे.

Grand i10 Nios मध्ये असलेलेच 1.2 लीटर 4 सिलिंडर नॅचरली अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळू शकते. हे इंजिन 83 bhp ताकद आणि 114 Nm टॉर्क प्रदान करते.

तर खालच्या व्हेरिअंटमध्ये सँट्रोचे इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे. या कारमध्ये मॅन्युअल आणि एएमटी असे दोन गिअरबॉक्स ऑप्शन मिळण्याची शक्यता आहे.

कंपनीने दाखविलेल्या टीझरमध्ये वेब सारख्या पॅटर्नमध्ये फ्रंट ग्रील देण्यात आली आहे. यामुळे या कारचे रुपडेच नवीन वाटणार आहे. टीझर पाहिल्यानंतर ही कार एक बॉक्सी एसयुव्ही वाटत आहे.

ह्युंदाई AX1 च्या बंपरवर एक एलईडी डे टाईम रनिंग लाई रिंगसह गोलाकार हेड लाईट दिसत आहे. त्याच्यावर एक स्लिक एलईडी डीआरएल देण्यात आला आहे. टीझर इमेजमध्ये टेललाईट एका त्रिकोणी पॅटर्नमध्ये दिसते.

या मायक्रो एसयुव्हीची टेस्टिंग भारतातही सुरु झाली आहे. ह्युंदाईने या कारचे सुरुवातीचे नाव AX1 ठेवले आहे. ही एक मायक्रो एसयुव्ही असणार आहे. जगभरात या कारचे वेगवेगळे व्हेरिअंट दिसले आहेत. तसेच सध्या या कारचे काही चोरून काढलेले फोटो, व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.