शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

क्रूझ कंट्रोलसह लॉन्च झाली Hero Xtreme 160R 4V, जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 12:45 IST

1 / 6
Hero MotoCorp : हीरो मोटोकॉर्पने भारतात आपल्या लोकप्रिय स्पोर्ट्स कम्यूटर बाईक Hero Xtreme 160R चे नवीन 4V क्रूज कंट्रोल व्हेरिएंट अधिकृतरीत्या लॉन्च केले आहे. काही आठवड्यांपूर्वी देशातील अनेक डीलरशिपवर या मॉडेलची जाहिराता करण्यात आली होती. आता कंपनीने त्याची किंमत आणि फीचर्स उघड करत ग्राहकांमध्ये उत्सुकता आणखी वाढवली आहे.
2 / 6
किंमत किती? नवीन Hero Xtreme 160R 4V क्रूज कंट्रोल व्हेरिएंटची किंमत ₹1,34,100 (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. ही किंमत स्टॅंडर्ड मॉडेलपेक्षा सुमारे ₹4,500 अधिक आहे. किंमत वाढीमागील मुख्य कारण म्हणजे यात जोडले गेलेले नवीन टेक्नॉलॉजी अपडेट्स आणि प्रीमियम फीचर्स.
3 / 6
नव्या मॉडेलमध्ये काय बदल झाले? यामध्ये मेकॅनिकल सेटअप पूर्वीप्रमाणेच आहे. बाईकमध्ये पूर्वीसारखाच 163.2cc सिंगल-सिलिंडर, एअर/ऑईल-कूल्ड इंजिन देण्यात आला आहे, जे 16.9 hp पावर (8,500 RPM) 14.6 Nm टॉर्क (6,500 RPM) निर्माण करते. परफॉर्मन्समध्ये कोणताही बदल नाही, मात्र फीचर्समध्ये मोठी सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामुळे बाइक आता प्रीमियम फील देते.
4 / 6
अधिक स्पोर्टी आणि मॉडर्न- Xtreme 250R सारखी दिसणारी नवीन LED हेडलाइट, 4.2 इंच कलर LCD इंस्ट्रुमेंट कन्सोल, स्पीड, गियर पोजिशन, फ्युएल आणि राइडिंग इन्फोची अधिक स्पष्ट माहिती मिळते. ही बाईक नवीन ग्राफिक्ससह चार नवीन कलर ऑप्शन्समध्ये लॉन्च झाल्यामुळे बाइकचा स्पोर्टी लुक आणखी आकर्षक झाला आहे.
5 / 6
160cc सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच क्रूज कंट्रोल- या बाईकचा सर्वात मोठा अपडेट म्हणजे क्रूज कंट्रोल + राइड-बाय-वायर थ्रॉटल सिस्टम. भारतामध्ये 160cc सेगमेंटमध्ये हा फीचर पहिल्यांदाच देण्यात आला आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात हा फीचर अत्यंत उपयोगी ठरणार आहे, कारण बाइक ठराविक वेगावर एक्सिलरेटर न धरताही चालू शकते.
6 / 6
या बाइकमध्ये तीन राइडिंग मोड्स रेन, रोड, स्पोर्ट देण्यात आला आहे. रायडर आपल्या गरजेनुसार हे मोड सहज बदलू शकतो. नव्या व्हेरिएंटमध्ये हँडलबारवर नवीन स्विचगियर सेटअप मिळतो. यामुळे राइड मोड्स सहज बदलता येतात. क्रूज कंट्रोलदेखील सहज अॅक्टिव्ह करता येतो. ही टेक्नॉलॉजी कंपनीने आधी Xtreme 125R आणि Glamour X मध्ये दाखवली होती, परंतु 160cc सेगमेंटमध्ये आणणे हे एक मोठे पाऊल मानले जाते.
टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पbikeबाईकAutomobile Industryवाहन उद्योग