Bajaj ची 'चेतक' विस्मृतीत गेलीय का? ती पुन्हा येणार; जुन्या आठवणी उजळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 09:47 AM2019-10-09T09:47:10+5:302019-10-09T09:50:57+5:30

बजाज ऑटो या अस्सल भारतीय कंपनीने एकेकाळी एका बाजुला इंजिन असलेली स्कूटर आणून धमाल उडवून दिली होती. त्यानंतर एम-80 ने भारतातील मातीच्या रस्त्यांवर धुरळाच केला होता. आता बजाज पुन्हा जुने दिवस आठवायला भाग पाडणार आहे. कारण बजाजची चेतक पुन्हा तीस वर्षांनी भारतीय रस्त्यांवर धावताना दिसणार आहे.

नव्वदीच्या दशकात गावागावात एकतरी चेतक असायचीच. तेव्हाची रेडिओ, टीव्हीवरील 'हमारा बजाज'ची जाहिरात तर अफलातून होती. कारण भारतीय रस्त्यांवर धावणारी ती स्कूटर तेव्हाची एकमेव होती. पुढच्या सीटलाच सस्पेन्शन तर खतरनाक होते. हीच बजाज पुन्हा आली तर, बालपणीचे दिवस आठवतील नाही का? ती येतेय.

बजाज पुन्हा ही चेतक बाजारात आणणार आहे. येत्या 16 ऑक्टोबरला बजाज सब ब्रँड अर्बनाईटच्या बॅनरखाली नवीन ई-चेतक लाँच करणार आहे. या चेतकची टक्कर Ather 450 शी होणार आहे. 2020 च्या सुरूवातीला या स्कूटरची विक्री होणार आहे.

या स्कूटरकला टेस्टिंगवेळी पाहिले गेले आहे. या स्कूटरबाबत अधिक माहिती मिळालेली नसली तरीही तिची स्टायलिंग काहीशी जुन्या स्कूटरसारखीच असणार आहे. तिला पाहताच रेट्रो लूकची स्कूटर आठवणार आहे.

स्कूटर दिसायला जरी जुन्यासारखी असली तरीही तिच्यामधील फिचर नवीन आहेत. आयबीएस, डिजिटल पॅनेलमध्ये बॅटरी रेंज, ओडोमीटर आणि ट्रीप मीटर असणार आहे. तसेच नेव्हीगेशनसाठी स्मार्टफोनची ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हीटी मिळणार आहे.