शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शानदार लूक अन् दमदार परफॉर्मेंस; Harley Davidson ने आणली सर्वात स्वस्त बाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 5:00 PM

1 / 5
Harley Davidson: हार्ले डेव्हिडसनच्या बाईक्स खूप महाग असतात, त्यामुळे सामान्यांना त्या परवडत नाहीत. पण, आता भारतीय बाजारात हार्ले डेव्हिडसनची सर्वात स्वस्त बाईक लॉन्च होणार आहे. कंपनी येत्या 3 जुलै रोजी Harley Davidson X440 लॉन्च करेल. लॉन्चिंगपूर्वी कंपनीने या बाईकचे काही फोटोज शेअर केले आहेत. या बाईकची बुकिंगदेखील सुरू झाली आहे.
2 / 5
ही बाईक कंपनीच्या ऑफिशिअल डीलरशिपवर बुक करता येईल, यासाठी 25,000 रुपये बुकिंग अमाउंट ठरली आहे. हार्लेकडून भारतीय बाजारात लॉन्च होणारी सर्वात स्वस्त बाईक असेल. कंपनी या बाईकची किंमत 2.5 लाख ते 3 लाख रुपयांदरम्यान ठेवण्याची शक्यता आहे. या बाईकची डिलिव्हरी या वर्षी सप्टेंबरपासून सुरू होईल.
3 / 5
हार्ले-डेविडसनने हीरो मोटोकॉर्पच्या मदतीने ही भारतातील पहिली बाईक तयार केली आहे. या बाईकची स्टायलिंग हार्लेकडून करण्यात आली आहे, तर इंजीनिअरिंग, टेस्टिंग आणि डेव्हलपमेंट हीरो मोटोकॉर्पने केली आहे. या स्टायलिश बाईकचा DNA हार्ले डेव्हिडसनचाच असेल. समोर आलेल्या फोटोमध्ये या बाईकवर डे-टाइम-रनिंग (DRL) लाइट्स लावलेले दिसत आहेत, ज्यावर 'Harley-Davidson' ची ब्रँडिंग आहे.
4 / 5
बाईकच्या समोर टेलीस्कोपिक फोर्कऐवजी USD फोर्क दिले आहेत, तर मागील बाजू ट्रेडिशनल ठेवली आहे. बाईकला मागे ट्वीन शॉक ऑब्झर्वर दिले आहेत. बाईकला दोन्ही बाजूस Bybre डिस्क ब्रेक आणि ड्युअल-चॅनेल ABS मिळेल. कंपनीने यात डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टरचा वापर केला आहे.
5 / 5
हार्ले-डेविडसन X440 ला मॉर्डन-रेट्रो लूक दिला आहे. कंपनीने या बाईकमध्ये नवीन दमदार 440 सीसी क्षमतेचे सिंगल-सिलेंडर इंजिन बसवले आहे. हे इंजिन 30-35 बीएचपी पॉवर जनरेट करेल. हे इंजिन 6-स्पीड ट्रांसमिशनसह येईल. या बाईकचे मायलेज 35-40 असण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Harley-Davidsonहार्ले डेव्हिडसनhero moto corporationहिरो मोटो कॉर्पbikeबाईकAutomobileवाहन