By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 16:42 IST
1 / 10नवीन कार आणि दुचाकी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्मची घोषणा केली होती. येत्या दिवाळीपर्यंत जीएसटी सुधारणा लागू केली जाऊ शकते. GST टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल करण्याबाबत केंद्र सरकारने प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे GST प्रणाली आणखी सोयीस्कर होईल.2 / 10GST मधील या बदलामुळे कार विशेषत: फॅमिली कार खरेदी करणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पैसे वाचण्याची शक्यता आहे. सरकार छोट्या आणि मोठ्या कारवरील टॅक्सच्या रेटमध्ये फरक करण्याचा विचार करत आहे. छोट्या कारवर सध्या २८ टक्के जीएसटी आणि १-३ टक्के सेस दर लागू आहे. नव्या बदलामुळे त्या १८ टक्के टॅक्स स्लॅबमध्ये येऊ शकतात. 3 / 10तर २८ टक्के टॅक्स स्लॅब हटल्यामुळे मोठ्या लग्झरी कार आणि एसयूवी ४० टक्क्यांच्या स्पेशल टॅक्स कॅटेगिरीत ट्रान्सफर केल्या जाण्याची शक्यता आहे. सरकारमधील सूत्रांनुसार, छोट्या कार लग्झरी आयटम नाहीत, त्यामुळे केवळ ५-७ लग्झरी वाहनेच ४० टक्क्यांच्या स्लॅबमध्ये ठेवण्याचा विचार सुरू आहे. सध्या हॅचबॅक, छोटी सेडान, मिनी एसयूवी छोट्या कारवर २८ टक्के जीएसटीसह पेट्रोल वाहनावर १ टक्के आणि डिझेलवर ३ टक्के Cess शुल्क लावले जाते. 4 / 10१२०० सीसी (१.२ लीटर) इंजिन क्षमता आणि ४ मीटरपेक्षा कमी लांबीच्या छोट्या वाहनांवर २८ टक्के इतका मोठा कर लावल्याने सामान्य ग्राहकांसाठी त्या कार आणखी महाग होतात. सरकार मीडियम साइजच्या कारवर लावण्यात येणारे करही काही प्रमाणात कमी करू शकते. सध्या १.२ लीटर अथवा १.५ लीटरपेक्षा अधिक इंजिन क्षमता असणाऱ्या मिड सेग्मेंट कार २८ टक्के जीएसटी स्लॅबमध्ये येतात. 5 / 10मिड सेग्मेंट कारवर १५ टक्के अतिरिक्त उपकरही लावला जातो. ज्यानंतर एकूण टॅक्सचा आकडा ४३ टक्क्यांपर्यंत जातो. आता या कारही ४० टक्क्यांच्या स्लॅबमध्ये समाविष्ट करण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर या कारवरही करमध्ये जवळपास ३ टक्के कपात होईल. त्यामुळे कार खरेदी करणाऱ्यांचे पैसे वाचण्याची ही संधी आहे. 6 / 10या कार स्वस्त होणार - जर जीएसटी सुधारणा दिवाळीआधी लागू झाली तर १.० लीटर आणि १.२ लीटर इंजिन क्षमता असणाऱ्या मारूती Alto, Wagan-R, Swift, Balleno Diser, TATA Tiago, Tigor, Punch, Hundai i10, i20 आणि एक्स्टरसारख्या कार स्वस्त होतील. त्याशिवाय रेनो क्विड, ट्राइबर, किगर, स्कोडा काइलॅकसारख्या कारच्या किंमतीत घट पाहायला मिळू शकते. 7 / 10दुसरीकडे १.५ लीटर इंजिन क्षमतेसह येणाऱ्या मारूती ब्रेजा, टाटा नेक्सन, किआ सेल्टॉस, सोनेट, हुंडई क्रेटासारख्या एसयूवी कारच्या किंमतीत फरक पडल्याचे दिसून येईल. कारसोबतच एंट्री लेवल बाइक्सच्या टॅक्स स्लॅबमध्ये बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या ३५० सीसीपर्यंत इंजिन बाईकवर २८ टक्के जीएसटी आकारला जातो, त्यात १८ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. 8 / 10तर ३५० सीसीहून अधिक इंजिन क्षमता असणाऱ्या बाईक्सचे दर वाढण्याची शक्यता आहे. सध्या या क्षमतेच्या इंजिन बाईकवर २८ टक्के जीएसटीसह ३ टक्के उपकर लावला जातो. त्यामुळे एकूण टॅक्स ३१ टक्क्यांपर्यंत जातो. 9 / 10भारतात कारपेक्षा दुचाकींची संख्या जास्त आहे आणि बहुतेक मोटारसायकल खरेदीदार हे एन्ट्री-लेव्हल किंवा कम्युटर सेगमेंटमधील आहेत. अशा परिस्थितीत जर सरकारने ३५० सीसी पर्यंतच्या बाईकवर जीएसटी करात १० टक्क्यांपर्यंत सवलत दिली तर ते खरेदीदार आणि बाजारपेठ दोघांनाही खूप फायदेशीर ठरेल.10 / 10केंद्र सरकारने सुधारित वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणालीअंतर्गत ५ टक्के आणि १८ टक्के असे दोन दर प्रस्तावित केले आहेत, अशी माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिली. सध्याच्या २८ टक्के कर श्रेणीतील ९० टक्के करपात्र वस्तू सुधारित कर प्रणालीमध्ये १८ टक्क्यांच्या श्रेणीत येण्याची शक्यता आहे.