शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बनावट FASTag ची होतेय विक्री, वेळीच व्हा सावध; NHAI ने दिला इशारा, अशी करा तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 3:32 PM

1 / 12
नववर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने वाहनधारकांसाठी फास्टॅग (FASTag ) अनिर्वाय केला आहे. देशभरामध्ये फास्टॅग लागू करण्यात आला आहे. या फास्टॅगचा वापर न करणाऱ्यांकडून सरकार दुप्पट दंड वसूल करत आहे. पेटीएमपासून (Paytm) ते विविध बँकांनी फास्टॅगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
2 / 12
तुम्ही तुमच्या गाडीमध्ये फास्टॅग लावला आहे किंवा फास्टॅग खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. FASTag मध्ये आता फ्रॉडची अनेक प्रकरणं समोर येत आहेत.
3 / 12
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) लोकांना फेक FASTag बाबत इशारा दिला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, काही फ्रॉडस्टर्सनी बनावट FASTag ची ऑनलाईन विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
4 / 12
बनावट फास्टॅग खऱ्या फास्टॅगप्रमाणे तयार करून विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ग्राहकांना अशाप्रकारच्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सावधानतेचा इशारा दिला आहे. बनावट फास्टॅगबाबत तक्रार कशी करायची हे जाणून घेऊया.
5 / 12
NHAI ने दिलेल्या माहितीनुसार, जर ग्राहकांनी चुकून बनावट फास्टॅग खरेदी केल्यास, त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हेल्पलाईन क्रमांक 1033 वर कॉल करून तक्रार दाखल करू शकतात.
6 / 12
सरकारने 15 फेब्रुवारी 2021 पासून देशभरात FASTag अनिवार्य केला आहे. त्यामुळे ज्या वाहनांना अद्यापही फास्टॅग लावण्यात आलेला नाही, त्यांना टोल प्लाझावर दुप्पट शुल्क भरावं लागेल.
7 / 12
डिजिटल व्यवहाराला प्राधान्य देण्यासाठी तसंच वेळेची आणि इंधनाची बचत करण्याच्या उद्देशाने हा फास्टॅगचा निर्णय घेण्यात आला आहे. FASTag खरेदीसाठी ग्राहक https://ihmcl.co.in/ वर किंवा MyFastag App चा वापर करू शकतात.
8 / 12
ग्राहक लिस्टेड बँक आणि अथॉराइज्ड एजेंट्सकडून फास्टॅग खरेदी करू शकतात. अ‍ॅमेझॉन, paytm द्वारेही FASTag खरेदी करता येतो. FASTag शी संबंधित माहिती IHMCL च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
9 / 12
फास्टॅग हा एक टॅग किंवा स्टिकर आहे. ते रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञानावर काम करते. टोलनाक्यावरील कॅमेरा स्टिकरवरचा बारकोड स्कॅन करतो आणि टोल आपोआप फास्टॅगच्या वॉलेटमधून कापला जातो.
10 / 12
वाहनधारकांना टोलनाक्यावर खोळंबावे लागत नाही. त्यामुळे वेळ आणि इंधन यांची बचत होते. प्रवासही झटपट होतो. फास्टॅग ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करता येऊ शकतो.
11 / 12
ॲथॉराइज्ड बँकेतून अथवा ई-कॉमर्स व्यासपीठांवरूनही ऑनलाइन मिळू शकतो. देशातील 23 ॲथॉराइज्ड बँका, भूपृष्ठ वाहतूक विभागाचे हजारो विक्री केंद्रे येथेही फास्टॅग तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो.
12 / 12
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांनी फास्टॅगची किंमत 100रुपये एवढी निश्चित केली आहे. याशिवाय 200रुपये अनामत रक्कम भरावी लागते. अनेक बँका आपल्याकडे ग्राहक आकर्षित व्हावे यासाठी किरकोळ किमतीचे फास्टॅगही देऊ करतात.
टॅग्स :Fastagफास्टॅगIndiaभारतcarकार