शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राज्य बदलले तरी वाहन नंबर तोच, बीएच सिरिज येणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 11:10 AM

1 / 8
मुंबई : केंद्र सरकारच्या वतीने हल्लीच वाहनांसाठी बीएच सिरीजची नवीन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकाने एकदा आपल्या वाहनाची बीएच सिरीजमध्ये नोंदणी केल्यावर दुसऱ्या राज्यात गेल्यावर आपल्या वाहनाची पुन्हा नव्याने नोंदणी करण्याची गरज भासत नाही.
2 / 8
ही बीएच सिरीजची नोंदणी त्याच वाहनांसाठी आहे. ज्या वाहनधारकांची सतत वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदली होत असते. आता राज्य बदलले तरी वाहनांचे नंबर बदलावे लागणार नाहीत.
3 / 8
बीएच सिरीजच्या वाहनाच्या नंबर प्लेटवर सुरुवातीला दोन संख्यांमध्ये वाहन नोंदणीचे वर्ष आहे. त्यानंतर बीएच, त्यानंतर भारत सिरीजचा कोड व शेवटी दोन अक्षरे असणार आहेत. वाहनाचा नंबर बीएचने सुरू होणार असल्याने त्याचा कोणत्याही राज्याशी संबंध नसणार आहे.
4 / 8
ज्यांचे कार्यालय ४ किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये आहे अशा कर्मचाऱ्यांना बीएच सिरीजचा नंबर मिळू शकेल. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना व सुरक्षा कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने ही नोंदणी वाहणासाठी करता येईल.
5 / 8
या सिरीजसाठी कार्यालयाद्वारे देण्यात येणाऱ्या ओळखपत्राच्या आधारे ही नोंदणी करता येऊ शकणार आहे. वाहन पोर्टलच्या माध्यमातून डीलरकडून फॉर्म २० व फॉर्म ६० ओळखपत्रासह भरून द्यावा लागणार आहे.
6 / 8
दहा लाखांपेक्षा कमी किमतीच्या वाहनावर आठ टक्के टॅक्स भरावा लागणार आहे. तर दहा ते वीस लाखांमध्ये किंमत असणाऱ्या वाहनावर दहा टक्के टॅक्स द्यावा लागणार आहे.
7 / 8
याचबरोबर, वीस लाखांच्या वर किंमत असणाऱ्या वाहनावर बारा टक्के टॅक्स भरावा लागणार आहे. तसेच, डिझेल वाहनांवर दोन टक्के अतिरिक्त दर, इलेक्ट्रिक वाहनांवर दोन टक्के कमी टॅक्स लागणार द्यााव लागणार आहे.
8 / 8
भारत सिरीजसाठी नोंदणी करताना दोन वर्षांचा रोड टॅक्स भरावा लागणार आहे. त्यानंतर १४ वर्षांपर्यंत प्रत्येक दोन वर्षांनी रोड टॅक्स भरावा लागणार आहे.
टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग