आमच्याकडे या! एलॉन मस्कनी आव्हानांचा पाढा वाचताच Tesla साठी तेलंगणनं रचल्या पायघड्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 04:38 PM2022-01-15T16:38:19+5:302022-01-15T17:01:54+5:30

Tesla Elon Musk : जगातील प्रमुख इलेक्ट्रीक वाहन उत्पादन कंपनी ‘टेस्ला’ला आपल्या कार भारतात दाखल करण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे आणि यावर मस्क यांनी नाराजीही व्यक्त केली होती.

Tesla Elon Musk : जगातील प्रमुख इलेक्ट्रीक वाहन उत्पादन कंपनी ‘टेस्ला’ला आपल्या कार भारतात दाखल करण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

या कारणामुळे कंपनीला भारतात दाखल होण्यास आणखी विलंब होईल. ‘टेस्ला’चे संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क यांनी गुरुवारी ही माहिती देत नाराजी व्यक्त केली होती.

भारतात कंपनीची उत्पादने कधी दाखल करणार? असा प्रश्न ट्विटरवर भारतीयाने विचारला होता. भारतात टेस्लाची कार उतरविण्यात कंपनीला सरकारी स्तरावर संकटांचा सामना करावा लागत असल्याचं उत्तर मस्क यांनी दिलं.

टेस्लाने पूर्णपणे तयार वाहनांवरील आयात शुल्क ४० टक्के कमी करण्याचे आवाहन केले आहे. येथे ४० हजार डॉलरपेक्षा स्वस्त गाड्यांवर ६० टक्के व त्यापेक्षा महाग गाड्यांवर १०० टक्के आयात शुल्क लागते.

अमेरिकेची इलेक्ट्रीक कार उत्पादक कंपनी टेस्लाच्या भारतीय बाजारपेठेत प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत तेलंगणाच्या एका मंत्र्याने टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकरी एलॉन मस्क यांना राज्यात प्रकल्प उभारण्यासाठी आमंत्रित केले आहे.

तेलंगणाचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री केटी रामाराव यांनी मस्क यांच्या ट्वीटला उत्तर दिलं. "मी भारतातील तेलंगणा राज्याचा उद्योग मंत्री आहे. भारतात / तेलंगणात प्रकल्प उभारण्यात येणारी आव्हानं दूर करण्यास मदत करताना आम्हाला आनंद होईल. राज्य अनेक शाश्वत उपक्रमांमध्ये चॅम्पियन आहे आणि भारतातील एक उत्तम बिझनेस डेस्टिनेशन आहे," असं ट्वीट त्यांनी केलंय.