Electric Vehicle: या वर्षी जगभरात 6 मिलियन इलेक्ट्रिक कार विकल्या जातील, गार्टनरच्या रिपोर्टमध्ये दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 15:57 IST
1 / 10 मागील काही वर्षात इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरावर भर दिला जातोय. अनेकजण पेट्रोल-डिझेलच्या वाहनांवरुन इलेक्ट्रीक वाहनांच्या दिशेने वळत आहेत. यातच आता 2022 मध्ये जगभरात 6 मिलियन इलेक्ट्रिक कार विकल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.2 / 10 मार्केट रिसर्च फर्म गार्टनरच्या एका रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये जगभरात EV चार्जरची संख्या 2.1 मिलियन युनिट्सपर्यंत वाढेल. हा आकडा 2021 मध्ये 1.6 मिलीयन होता.3 / 10 गार्टनरच्या अंदाजानुसार, 2022 मध्ये इलेक्ट्रिक कार एकूण ईव्ही शिपमेंटपैकी 95 टक्के प्रतिनिधित्व करतील आणि उर्वरित बस, व्हॅन आणि अवजड ट्रकमध्ये विभागल्या जातील.4 / 10 2021 मध्ये एकट्या टेस्लाने 1 मिलियन वाहने विकण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. पण, प्रत्यक्षात 936,172 वाहनांची विक्री झाली. पण, मागील वर्षाच्या तुलनेत 87 टक्के वाढ झाली आहे. 5 / 10 नोव्हेंबर 2021 मध्ये 'COP26' मध्ये, शून्य उत्सर्जन वाहन संक्रमण परिषदेने मान्य केले होते की, ऑटोमेकर्स 2040 पर्यंत फक्त शून्य-उत्सर्जन वाहने विकण्यासाठी वचनबद्ध असतील आणि त्याआधी प्रमुख बाजारपेठांमधील वाहतुकीत डीकार्बोनायझेशनची तयारी करण्यासाठी ऑटोमोटिव्ह क्षेत्रावर दबाव आणतील.6 / 10 गार्टनरचे संशोधन संचालक जोनाथन डेव्हनपोर्ट म्हणाले की, वाहतूक क्षेत्रातील CO2 उत्सर्जन कमी करण्यात मदत करण्यासाठी ईव्ही हे महत्त्वाचे पॉवरट्रेन तंत्रज्ञान आहे. 7 / 10 सध्या असलेल्या चिप्सच्या कमतरतेचा 2022 मध्ये ईव्ही उत्पादनावर परिणाम होईल. व्हॅन आणि ट्रकची विक्री सध्या कमी आहे, पण हीदेखील येणाऱ्या काळात वेगाने वाढेल. 8 / 10 2030 पर्यंत सर्व विक्रीपैकी 40 टक्के ईव्हीचा वाटा असावा आणि ऑटोमेकर्सनी इलेक्ट्रिक कार तयार करण्यासाठी नवीन कारखाने सुरू करावेत, असा आदेश चीनने ऑटोमेकर्सवर लादला आहे.9 / 10 2022 मध्ये जागतिक ईव्ही शिपमेंटमध्ये चीनचा वाटा 46 टक्के असेल. वेस्टर्न युरोप 2022 मध्ये 1.9 मिलियन युनिट्स पाठवण्याच्या वेगावर आहे. 10 / 10 तर, 2022 मध्ये 855 हजार इलेक्ट्रिक वाहनांसह शिपमेंटमध्ये उत्तर अमेरिका तिसरा सर्वात मोठा प्रदेश असेल अशी अपेक्षा आहे.