MG Astor Price: दीपा मलिकचा आवाज, देशातील पहिली रोबोट कार; MG Astor ची किंमत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 02:55 PM2021-10-11T14:55:10+5:302021-10-11T15:01:55+5:30

MG Astor Price in India: MG Astor ही Hyundai Creta आणि Kia Seltos ला थेट टक्कर देणार आहे. मारुतीची ब्रेझा जरी या रेंजमध्ये असली तरी देखील फिचर्सच्या तुलनेत ती खूप मागे आहे.

MG Motors ने मिड साईज एसयुव्ही MG Astor भारतात लाँच केली आहे. MG Astor ला कंपनीने 4 व्हेरिअंटमध्ये बाजारात आणले आहे. यामध्ये स्टाईल, सुपर, स्मार्ट आणि शार्प या ट्रिम आहेत. शार्प या एसयुव्हीचे टॉपचे व्हेरिअंट आहे.

MG Motors ने अॅस्टरला 9,78,000 रुपये एक्स शोरुम या किंमतीमध्ये आणले आहे. तर या कारच्या टॉप मॉडेलची किंमत 16,78,000 रुपये आहे. जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर कंपनीने सांगितले की, याची बुकिंग 21 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

MG Astor ही Hyundai Creta आणि Kia Seltos ला थेट टक्कर देणार आहे. मारुतीची ब्रेझा जरी या रेंजमध्ये असली तरी देखील फिचर्सच्या तुलनेत ती खूप मागे आहे.

एमजी अॅस्टरच्या कारची डिलिव्हरी नोव्हेंबरपासून सुरु केली जाणार आहे. डिसेंबरपर्यंत या एसयुव्हीच्या कमीतकमी 5000 युनिट विकण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे.

MG Motors ने सांगितले की, Astor ही देशाची पहिली आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) कार आहे. या कारमध्ये एक AI रोबोट असेल. जो तुमच्याशी बोलेल आणि कारचे अनेक कनेक्टेड फिचर्स वापरेल.

MG Astor मध्ये जो एआय रोबोट असेल त्याचा आवाज पॅरालंपीक अॅथलिट दीपा मलिक (Deepa Malik) चा असणार आहे. हा रोबोट कारला कनेक्टेड फिचर्सशी संबंधीत अनेक काम करणार आहे.

हा रोबोट कारच्या डॅशबोर्डवर देवी, देवतांची मूर्ती लावतात तिथे लावलेला असेल. सनरुफ उघडणे, नेव्हिगेशन सुरु करणे आदी कामे करेल. इमरजन्सी किंवा कार हरविण्याच्या परिस्थीतत तो डिजिटल चावीचे काम करेल. याद्वारे तुम्ही कार अनलॉक, लॉक करण्याचे काम करेल. गाडीमध्ये एकूण 27 स्टँडर्ड सेफ्टी फिचर्स आणि 49 अन्य सेफ्टी फिचर्स व्हेरिअंटनुसार देण्यात आले आहेत.

कंपनीच्या सध्याच्या इलेक्ट्रीक एसयुव्ही मॉडेल ZS EV चंच पेट्रोल इंटर्नल कम्ब्युशन इंजिन (ICE) व्हर्जन आहे. यामध्ये कंपनीनं 1.5 लीटर क्षमतेच्या 4 सिलिंडर युक्त माईल्ड हायब्रिड तंत्रज्ञानानं युक्त अशा पेट्रोल इंजिनचा वापर केला आहे.

हे पेट्रोल इंजिन 141bhp ची पॉवर आणि 240Nm चा टॉर्क जनरेट करतं. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असिस्टंट आणि सेगमेंटमधील पहिली ऑटोनॉमस लेव्हल 2 कार Astor च्या बद्दल एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा यांनी माहिती दिली.

MG Astor मध्ये एका विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून त्यातील कॅमेरा ड्रायव्हिंगच्या वेळी निरनिराळ्या सुविधा पुरवणार आहे. यामध्ये अॅडप्टिव्ही क्रुझ कंट्रोल, लेन किपिंग असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमरजेन्सी ब्रेकिंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, रिअर ड्राइव असिस्ट (RDA), लेन डिपार्चर प्रिवेंशन, इंटेलिजंट हेडलँप कंट्रोल (IHC) आणि स्पीड असिस्ट सिस्टम सारखे फीचर्स सामिल आहेत.

याशिवाय ड्युअल टोन अलॉड व्हिल्स, आय स्मार्ट कनेक्टसोबत डिजिटल कन्सोल, 8 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, सनरुफ आणि अन्य फीचर्सही देण्यात येत आहेत. ही एसयुव्ही ह्युंदाई क्रेटा आणि सेल्टॉस यांसारख्या मॉडेल्सना टक्कर देईल.