शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

5-स्टार सेफ्टी अन् प्रीमियम फीचर्स! क्रेटा आणि ग्रँड व्हिटाराला टक्कर द्यायला आली नवीन SUV

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 14:47 IST

1 / 7
Citroen Aircross X Price & Features: भारताच्या SUV बाजारात फ्रेंच ऑटोमेकर सिट्रोन (Citroen) ने आपली नवी SUV Aircross X लॉन्च केली आहे. आकर्षक डिझाइन, दमदार इंजिन आणि प्रीमियम फीचर्ससह ही SUV बाजारात उतरली असून तिची सुरुवातीची किंमत ₹8.29 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या “Citroen 2.0 – Shift Into the New” या धोरणांतर्गत हे तिसरा मॉडेल आहे. याआधी C3X आणि Basalt X सादर करण्यात आले होते.
2 / 7
काय खास आहे ? बाहेरून नवीन डीप फॉरेस्ट ग्रीन कलर आणि टेलगेटवर खास ‘X’ बॅजिंग मिळते. तसेच, केबिनमध्ये सॉफ्ट-टच लेदरेट रॅपिंग, 10.25-इंच बेझल-लेस इंफोटेनमेंट डिस्प्ले, 7-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, गोल्ड एक्सेंट्स आणि नवीन गिअर-लीव्हर डिझाइन, वेंटिलेटेड लेदरेट सीट्स, डीप ब्राऊन इंटीरियर थीम, अॅम्बिएंट व फुटवेल लाईटिंगमुळे गाडीला अधिक प्रीमियम टच मिळतो.
3 / 7
या SUV मध्ये पॅसिव्ह एंट्री व पुश-स्टार्ट बटण, क्रुझ कंट्रोल आणि स्पीड लिमिटर, ऑटो-डिमिंग इनसाइड रियर व्ह्यू मिरर (IRVM), LED प्रोजेक्टर फॉग लॅम्प्स, वेंटिलेटेड सीट्स, सॅटेलाइट व्यूसह 360-डिग्री कॅमेरा आणि कंपनीचा स्वतःचा स्मार्ट CARA AI असिस्टंट मिळतो.
4 / 7
वेरिएंट्स व किंमती (एक्स-शोरूम)- YOU (Puretech 82 मॅन्युअल, 5-सीटर) – ₹8,29,000, PLUS (Puretech 110 मॅन्युअल, 5/7-सीटर) – ₹9,77,000 ते ₹11,37,000 आणि MAX (Puretech 110, 7-सीटर) – ₹12,34,500 (मॅन्युअल), ₹13,49,100 (ऑटोमॅटिक) किंमत आहे.
5 / 7
सिट्रोनचा दावा आहे की, Aircross X मध्ये 40 पेक्षा जास्त ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेफ्टी फीचर्स आहेत. Aircross X त्या ग्राहकांसाठी आहे, जे केवळ SUV चा आकार नाही, तर प्रीमियम इंटीरियर, टेक्नॉलॉजी आणि आधुनिक फीचर्सची अपेक्षा करतात.
6 / 7
Bharat NCAP क्रॅश टेस्ट मध्ये Aircross ला एडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शनसाठी 5-स्टार रेटिंग, तर चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनसाठी 4-स्टार रेटिंग मिळाली आहे. Aircross 5S वेरिएंटने AOP मध्ये 32 पैकी 27.05 पॉइंट्स, आणि COP मध्ये 49 पैकी 40 पॉइंट्स मिळवले आहेत.
7 / 7
इंजिन ऑप्शन्स- 1.2-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन, 1.2-लीटर नॅचुरली ॲस्पिरेटेड इंजिन, हे इंजिन्स 110hp पर्यंत पॉवर आणि 205Nm टॉर्क देते. यात 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक मिळेल. या कारची भारतीय बाजारात हुंडई क्रेटा, किआ सेल्टॉस आणि मारुती ग्रँड विटाराशी स्पर्धा आहे.
टॅग्स :Citroen Indiaसिट्रॉनcarकारAutomobileवाहनHyundaiह्युंदाईMaruti Suzukiमारुती सुझुकी