शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्वस्तात कार विकत घेण्याची संधी; 4.24 लाख रुपयांच्या 'या' कारवर मिळतोय बंपर डिस्काउंट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 2:54 PM

1 / 9
आपले कार खरेदीचे बजेट कमी असेल आणि आपण एक बिलकूल पैसा वसूल कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे. Renault kwid ही आधीच एक स्वस्त कार आहे आणि हिचे पैसा वसूल फीचर्स हिला आणखीनच विशेष बनवतात.
2 / 9
आता Renault India ने आधीच स्वस्त असलेल्या या कारवर तब्बल 80,000 रुपयांचा डिस्काउंट दिला आहे. ग्राहकांना कंपनीच्या या ऑफरचा लाभ 31 मार्च 2022 पर्यंत घेता येऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर आम्ही आपल्याला डिस्काउंट संदर्भात संपूर्ण माहिती देत आहोत.
3 / 9
नेमकी ऑफर काय... - Renault kwid वर मिळत असलेल्या 80,000 रुपयांपर्यंतच्या ऑफरमध्ये 10,000 रुपयांपर्यंतची रोख सूट, 15,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. याशिवाय, रेनो आपल्या जुन्या ग्राहकांना 37,000 रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनसही देत आहे. तसेच, जुने वाहन स्क्रॅप केल्यास 10,000 रुपयांपर्यंतचा स्वतंत्र फायदाही कंपनी आपल्या ग्राहकांना देत आहे.
4 / 9
Renault India ची ही कार केवळ 4.24 लाख रुपये एवढ्या एक्सशोरूम किमतीत ग्राहकांना मिळते. तसेच, 80,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटनंतर हिची किंमत आणखीनच कमी होऊन जाते.
5 / 9
क्विडमध्ये देण्यात आले आहेत जबरदस्त फीचर्स - आपल्या मार्केटमध्ये मारुती सुझुकी ऑल्टो, एस-प्रेसो आणि डॅट्सन रेडी गो यांची तुलना Renault kwid सोबत केली जाते. या लोकप्रीय हॅचबॅकला कंपनीने स्टायलिश हेडलॅम्प्ससह एलईडी डीआरएल, एलईडी टेललॅम्प्स, मल्टी स्पोक्ड व्हिल्स आणि विशेष ग्रिल मिळाली आहे.
6 / 9
Renault India ने क्विडला 2 पेट्रोल इंजिन पर्याय दिले आहेत. यात पहिले 0.8-लिटर इंजिन आहे. हे इंजिन 54 बीएचपी एवढी पॉवर देते, तर 72 एनएम पीक टॉर्क तयार करते. दुसरे क्रमांकावर 1.0-लीटर पेट्रोल इंजिन येते. हे इंजिन 68 बीएचपी एवढी पॉवर, तर 91 एनएम पीक टॉर्क तयार करते.
7 / 9
मायलेजच्या बाबतीतही क्विड अत्यंत उत्तम पर्याय आहे. ही कार एक लीटर पेट्रोलमध्ये 22 किमीपर्यंत मायलेज देते.
8 / 9
Renault India ने क्विडला 2 पेट्रोल इंजिन पर्याय दिले आहेत. यात पहिले 0.8-लिटर इंजिन आहे. हे इंजिन 54 बीएचपी एवढी पॉवर देते, तर 72 एनएम पीक टॉर्क तयार करते. दुसरे क्रमांकावर 1.0-लीटर पेट्रोल इंजिन येते. हे इंजिन 68 बीएचपी एवढी पॉवर, तर 91 एनएम पीक टॉर्क तयार करते.
9 / 9
सुरक्षेसंदर्भात विचार केल्यास, एबीएससह ईबीडी, रियर पार्किंग सेंसर्स आणि इतरही काही सेफ्टी फीचर्स क्विडमध्ये देण्यात आले आहेत.
टॅग्स :Renaultरेनॉल्टcarकारAutomobileवाहन