शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

2022 Maruti Suzuki Baleno : बुधवारी लाँच होणार न्यू जनरेशन मारुती बलेनो २०२२; पाहा किंमत आणि सर्व फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 1:57 PM

1 / 7
मारुती सुझुकी (Maruti Suzuki) बुधवारी २३ फेब्रुवारी रोजी न्यू जनरेशन बलेनो (Baleno) प्रीमियम हॅचबॅक लाँच करणार आहे. 2022 मारुती सुझुकी बलेनोमगध्ये इंटरनल आणि एक्स्टरनल दोन्ही बाबतीत अनेक बदल दिसतील.
2 / 7
नवीन बलेनोचे डिझाइन सध्याच्या प्रीमियम हॅचबॅक मॉडेलप्रमाणेच दिसते. मात्र, याला शार्प लुक देण्यासाठी त्यात काही किरकोळ बदल करण्यात आले आहेत. 2015 मध्ये लाँच झाल्यापासून मारुतीसाठी त्याच्या सेगमेंटमध्ये बलेनोची ही टक्कर देणारी गाडी मानली जात आहे. या कारची स्पर्धा भारतातील टाटा अल्ट्रोज ​​(Tata Altroz), ह्युंदाई आय 20 (Hyundai i20) आणि होंडा जॅझ (Honda Jazz) यांच्याशी होते.
3 / 7
2022 मारुती सुझुकी बलेनोमध्ये थ्री-एलिमेंट DRL सह एलईडी हेडलाइट्सच्या नवीन सेटसह पुन्हा डिझाइन केलेली रुंद फ्रंट ग्रिल मिळेल. विंडो लाईन्सवर क्रोम ट्रीटमेंट व्यतिरिक्त, नवीन बलेनोच्या बाजूला रिडिझाइन केलेले 10-स्पोक अलॉय व्हील देण्यात आले आहेत. कारच्या मागील बाजूस नवीन LED रॅपराऊंड टेललाइट्स मिळतील आणि मागील बंपर देखील चांगलं अपडेट करण्यात आलं आहे.
4 / 7
अलीकडे, भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनं आता नवीन बलेनो फेसलिफ्ट मॉडेलच्या कनेक्टेड कार टेक फीचर्ससह एक टीझर व्हिडीओ जारी केला आहे. टीझर व्हिडीओमध्ये सुझुकी कनेक्ट अॅप दिसत असून ते 2022 मारुती बलेनोसोबत कनेक्ट केलं जाईल.
5 / 7
टीझर व्हिडिओमधून सुझुकी कनेक्ट अॅपमध्ये वाहनाशी संबंधित माहिती मिळेल. यामध्ये फ्युअल गेज रिडिंग, डिस्टन्स टू एम्प्टी, ओडोमीटर आणि अन्य महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश असेल. यामध्ये कारच्या संपूर्ण हेल्थबाबतही माहिती मिळेल. तसंच कार लॉक अनलॉकचंही फीचर यात असेल.
6 / 7
याशिवाय यामद्ये अन्य सेगमेंट्स फर्स्ट फीचर्स म्हणजेच 9 इंचाचा डिजिटल टच स्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्ट, 360 व्ह्यू कॅमेरा आणि एक हेड अप डिस्प्ले स्क्रिनसोबत सादर केला जाणार आहे.
7 / 7
2022 Maruti Suzuki Baleno ही कार 6.50 लाख रूपयांच्या एक्स शोरूम किंमतीवर लाँच केली जाऊ शकते अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. तसंच याच्या टॉप व्हेरिअंटची किंमत 10 लाखांपर्यंत असण्याची शक्यता आहे. सध्याच्या बोलेनोची एक्स शोरुम किंमत 7.01 लाख रुपये आणि 10.86 लाख एक्स शोरुम इतकी आहे.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीIndiaभारत