शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

वडिलांनी पोलिसांसमोर जोडले हात, अनंत गर्जेच्या घरासमोरच डॉक्टर गौरी पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 12:31 IST

1 / 7
Anant Garje Gauri Palwe: पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याच्या पत्नीने मुंबईतील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अनंत गर्जेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. गर्जेच्या अटकेनंतर मयत डॉक्टर गौरी पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
2 / 7
अनंत गर्जेला अटक करण्यात आल्यानंतर गौरी पालवे यांचा मृतदेह अहिल्यानगर जिल्ह्यातील मोहोज देवढे गावात आणण्यात आला होता. अनंत गर्जे याचे हे गाव असून, त्याच्या घरासमोरच सरण रचण्यात आले. त्यामुळे दोन्हीकडील नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली.
3 / 7
अनंत गर्जेच्या घरासमोर गौरीचे पार्थिव आणल्यानंतर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. घरासमोरच अंत्यसंस्कार करणार अशी भूमिका गौरीचे वडील आणि नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे तणाव वाढला. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.
4 / 7
गौरीच्या वडिलांनी पोलिसांसमोर हात जोडत टाहो फोडला. त्यांच्या आक्रोशाने सगळ्याच काळजात कालवाकालव झाली. 'जर तुम्हाला मुलगी असेल, तर मला न्याय द्या. श्रीमंताला मुलगी देऊ नका. त्यांच्या नादी लागू नका', असा आक्रोश अशोक पालवे यांनी केला. पोलिसांनी मध्यस्थी करत तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला.
5 / 7
मध्यस्थीनंतर घराच्या दारात अंत्यसंस्कार न करता घराच्या बाजूला सरण रचण्यात आले. तिथेच डॉक्टर गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गौरीच्या आईवडिलांना हंबरडा फोडला.
6 / 7
डॉक्टर गौरी यांचे पार्थिव अनंत गर्जेला अटक झाल्यानंतर पाथर्डी तालुक्यात असलेल्या मोहोज देवढे गावात आणण्यात आले होते. पोलीस बंदोबस्तातच गौरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
7 / 7
अनंत गर्जेचे विवाहबाह्य संबंध असल्याचे डॉक्टर गौरी यांना कळले होते. एका महिलेचा गर्भपात केल्याचे कागदपत्रे गौरी यांना घरात सापडली होती. त्या महिलेच्या गर्भपात करण्याच्या कागदपत्रांवर पती म्हणून अनंत गर्जेचे नाव होते. त्याचबरोबर काही चॅटिंगही गौरी यांनी बघितली होती.
टॅग्स :Dr, Gauri Palve Anant Garje Caseडॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणCrime Newsगुन्हेगारीMumbai policeमुंबई पोलीसDeathमृत्यू