Dream Meaning: स्वप्नात या गोष्टी दिसल्या तर, नशीब बदलू शकते; काय असतात संकेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 11:50 AM2023-01-17T11:50:25+5:302023-01-17T11:55:35+5:30

कधी स्वप्ने आपल्याला आपल्या आयुष्यातील पडद्यामागील दृश्य दाखवतात तर कधी भविष्याचे संकेतही देतात.

झोपताना स्वप्न पाहणे ही एक सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. अनेकजण त्याचा चांगल्या वाईटाशी संबंध जोडतात. कधी स्वप्ने आपल्याला आपल्या आयुष्यातील पडद्यामागील दृश्य दाखवतात तर कधी भविष्याचे संकेतही देतात. काही स्वप्ने वाईट असतात तर काही स्वप्ने चांगलीही असतात. हे स्वप्न अनेकदा काही संकेतही देत असते.

शुभ संकेत देणारी स्वप्ने भविष्यात तुम्हाला फायद्याची ठरू शकतात, असे मानले जाते. अशी काही स्वप्ने आहेत जी दिसल्यास तुम्हाला धनलाभ होऊ शकतो, असे सांगितले जाते. कोणती कोणती असतात ही स्वप्ने...

स्वप्नात कमळाचे फूल दिसले तर भविष्यात तुम्हाला लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळू शकतो. किंवा लवकरच तुम्हाला भरपूर पैसे मिळण्याचे ते संकेत असतात.

जर तुम्हाला स्वप्नात मधमाशांचे पोळे दिसले तर ते खूप शुभ चिन्ह मानले जाते. मधमाशीचे पोळे म्हणजे तुमच्या आयुष्यात खूप आनंद येणार आहे, असे म्हटले जाते.

स्वप्नात दूध पिणे हे आर्थिक लाभाचे लक्षण आहे. जर तुम्ही पैशाच्या कमतरतेने झगडत असाल आणि स्वप्नात दूध पिताना दिसले तर याचा अर्थ तुमचा त्रास लवकरच दूर होणार आहे, असे मानले जाते.

स्वप्नात मुंगूस दिसणे खूप शुभ मानले जाते. शास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात मुंगूस दिसले तर भविष्यात तुम्हाला सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने मिळतील, असे मानले जाते.

पांढऱ्या मुंग्या दिसणे हे देखील खूप शुभ लक्षण आहे. स्वप्नातील पुस्तकानुसार, पांढऱ्या मुंग्या पाहणे म्हणजे पैसे मिळणे आणि तुम्ही लवकरच श्रीमंत होऊ शकता, असे मानले जाते.

(अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती सामान्य समजुतींवर आधारित आहे. लोकमत याची पुष्टी करत नाही.)