जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST2021-02-05T06:05:59+5:302021-02-05T06:05:59+5:30
परभणी : येथील जिल्हा परिषदेतील पदवीधर कर्मचाऱ्यांनी २८ जानेवारी रोजी मधल्या सुटीत जि.प. कार्यालयासमोर निदर्शन आंदोलन केले. जि.प.तील पदवीधर ...

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे आंदोलन
परभणी : येथील जिल्हा परिषदेतील पदवीधर कर्मचाऱ्यांनी २८ जानेवारी रोजी मधल्या सुटीत जि.प. कार्यालयासमोर निदर्शन आंदोलन केले.
जि.प.तील पदवीधर कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. राज्य सहकारी गट ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने दिलेल्या निवेदनानुसार परिचर वर्ग ४च्या संवर्गातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न रखडले आहेत. त्याविषयी शासनस्तरावरून कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटनेने राज्यव्यापी संप सुरू केला आहे. या संपात जिल्हा परिषदेतील पदवीधर कर्मचारी सहभागी झाले आहेत. २७ जानेवारीपासून हा संप सुरू करण्यात आला. याअंतर्गत कर्मचाऱ्यांनी दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज केले. त्यानंतर मध्यंतरात जि.प. कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात जि.प.तील पदवीधर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. २९ जानेवारी रोजी हे कर्मचारी संपूर्ण दिवसभर लाक्षणिक संप करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटनेचे गजानन इंगळे, राजेश डुमलवाड, सचिन लांडगे यांनी दिली.